Yashasvi Jaiswal : सत्कार सोहळ्यात यशस्वीला भलतंच टेन्शन, अजितदादांनी कानमंत्र दिला, जयस्वालनं पाच शब्दात भाषण संपवलं
Yashasvi Jaiswal : टीम इंडियाचा युवा खेळाडू यशस्वी जयस्वालला भाषणापूर्वी भलतंच टेन्शन आल्याच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानभवनात टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वालसह (Yashasvi Jaiswal) सपोर्ट स्टाफचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,(Ajit Pawar) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह आमदार उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी यशस्वी जयस्वालनं पाच शब्दात त्याचं भाषण संपवलं. यशस्वी जयस्वालच्या भाषणाचा एक किस्सा अजित पवार यांनी सांगितला.
यशस्वी जयस्वालच्या भाषणामागची स्टोरी
यशस्वी जयस्वाल हा टीम इंडियाचा सर्वात युवा खेळाडू आहे. शिवम दुबेनं मनोगत व्यक्त केल्यानंतर यशस्वी जयस्वालची वेळ होती.यशस्वीनं केवळ पाच शब्दात त्याचं भाषण संपवलं. नमस्कार, आमची मुंबई, जय महाराष्ट्र म्हणून भाषण संपवलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशस्वी जयस्वालच्या भाषणामागील स्टोरी सांगितली. ते म्हणाले की,यशस्वी जयस्वाल नवखा आहे, शिवम दुबे ज्यावेळी भाषणाला उठला त्यावेळी भाषण करायला सांगू नका असं म्हटला. मी फक्त त्याला जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हणायला सांगितलं, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणं यशस्वी जयस्वालनं केवळ पाच शब्दात भाषण संपवलं.
आम्हीपण सूर्यकुमार यादवकडे बघितलं असतं : अजित पवार
रोहित शर्मा, सूर्य कुमार यादवचे खूप खूप कौतुक करतो. सूर्यकुमारनं ज्या प्रकारे कॅच घेतला. त्याचा पाय बाहेर टेकला असता तर आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला नसता. तू अप्रतिम झेल संपूर्ण भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते. रोहितनं सांगितलं नसता घेतला तर तुझ्याकडे बघितलं असतं, पण रोहितनं एकट्यानं बघितलं नसतं आम्ही पण बघितलं असतं, असं अजित पवार म्हणाले.
आमचे लोक फार वेडे आहेत. जिंकल्यावर उदो उदो करतात. हरल्यानंतर दगड मारायला कमी नाही करत, असं अजित पवार म्हणाले. आपल्याला खिलाडूपणा पाहायला मिळत नाही. पण, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी यांनी हा खेळ आपल्यामध्ये रुजवण्याचं काम केलं आहे, अजित पवार यांनी म्हटलं.
सूर्यकुमार यादवकडे बघितलं असतं.. : रोहित शर्मा
रोहित शर्मानं काल जे मुंबईत आम्ही बघितलं होतं ते आम्हा सर्वांसाठी स्वप्न होतं. वर्ल्ड कप इंडियात आणायचं स्वप्न होतं. आम्ही 11 वर्ष थांबलो होतो. 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो होतो. सूर्यकुमार, दुबे किंवा जयस्वाल, माझ्यामुळं झालं नाही तर सर्वांमुळं झालंय, असं रोहित शर्मा म्हणाले. सर्व खेळाडूंनी जेव्हा टीमला गरज होती तेव्हा कामगिरी संघाला जिंकवलंय. सूर्यकुमार यादवनं सांगितलं की हातात बॉल बसला बरं झाल नाही तर त्याला मी पुढं बसवला असता, असं रोहित शर्मा म्हणाला.
संबंधित बातम्या :