एक्स्प्लोर

WTC Final Scenario : फायलनमध्ये जाण्यासाठी 4 संघात तुफान रेस; टीम इंडियासाठी काय आहे समीकरण? जाणून घ्या सर्व देशांचे रणसंग्रमाचं गणित

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत टीम इंडियाशिवाय आणखी तीन संघ आहेत. अशा परिस्थितीत चारही संघांचे समीकरण जाणून घेऊया.....

WTC Final 2025 Scenario : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाला ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. दोन्ही डावात भारतीय संघाची फलंदाजी खराब राहिली, त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने पहिल्या डावात केवळ 180 धावा केल्या होत्या, तर ऑस्ट्रेलियाने 337 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय संघ 175 धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ 19 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी सहज गाठले.

या पराभवानंतर भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला. भारताचा पीसीटी आता 57.29 वर आहे, तर ऑस्ट्रेलिया 60.71 पीसीटी गुणांसह पहिल्या आणि दक्षिण आफ्रिका 59.26 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या शर्यतीत श्रीलंका संघाचाही समावेश आहे. जे फायनलमध्ये पोहोचू शकतात. अशा परिस्थितीत या चार देशांचे अंतिम फेरीत जाण्याचे समीकरण काय आहे ते पाहूया.

टीम इंडियासाठी काय आहे समीकरण?
उर्वरित सामने : 3 (ऑस्ट्रेलियाविरुद्ध)
पीसीटी : 57.29

भारत अजूनही फायनलमध्ये पोहोचू शकतो, पण त्यासाठी प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक असेल. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचे उर्वरित तीन सामने जिंकल्यास पीसीटी 64.05 पर्यंत जाईल. भारताने ही मालिका 4-1 ने जिंकल्यास ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धची आगामी मालिका जिंकली तरी अंतिम फेरीत त्यांचे स्थान निश्चित होईल.

ऑस्ट्रेलियासाठी काय आहे समीकरण?
उर्वरित सामने : 5 (3 भारताविरुद्ध, 2 श्रीलंकेविरुद्ध)
पीसीटी : 60.71

ॲडलेडमधील विजयासह ऑस्ट्रेलियाने आपली जागा अजून मजबूत केली आहे. त्यांनी सर्व सामने जिंकल्यास पीसीटी 71.05 पर्यंत पोहोचेल. भारताविरुद्ध आणखी दोन विजय आणि श्रीलंकेवर क्लीन स्वीप केल्याने फायनलमधील स्थान निश्चित होईल.

दक्षिण आफ्रिकेसाठी काय आहे समीकरण?
उर्वरित सामने : 3 (श्रीलंकेविरुद्ध 1, पाकिस्तानविरुद्ध 2)
पीसीटी : 59.26

दक्षिण आफ्रिकेलाही अंतिम फेरी गाठण्याची चांगली संधी आहे. त्यांनी तिन्ही सामने जिंकल्यास पीसीटी 69.44 होईल. जर त्यांनी श्रीलंकेचा पराभव केला आणि पाकिस्तानविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधली तर पीसीटी  61.11 होईल, जे अंतिम फेरीसाठी पुरेसे असेल.

श्रीलंकेसाठी काय आहे समीकरण 
उर्वरित सामने : 3 (1 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, 2 ऑस्ट्रेलियाविरुद्ध)
पीसीटी  : 50

अंतिम फेरी गाठण्यासाठी श्रीलंकेला सर्व सामने जिंकावे लागतील. त्यांनी तिन्ही सामने जिंकल्यास पीसीटी 61.53 होईल. जर त्यांनी फक्त दोन सामने जिंकले तर त्यांचे पीसीटी 53.84 होईल, जे अंतिम फेरीसाठी पुरेसे नाही. अशा स्थितीत त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे.

हे ही वाचा -

Ind vs Aus 3rd Test : चुकीला माफी नाही... मोहम्मद सिराज-ट्रॅव्हिस हेडवर लागणार एका सामन्याची बंदी? ICC ॲक्शन मोडवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 23 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सWalmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखलABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची ओळख पटली, नेपाळमधील चार तर उत्तर प्रदेशातील 'इतक्या' जणांचा दुर्दैवी मृत्यू
Abhishek Sharma : 6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
6,6,6,6,6,6... गुरू युवराज सिंगवर भारी पडला अभिषेक शर्मा! धमाकेदार खेळीनंतर मोडला षटकारांचा विक्रम, पाहा Video
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला,पुण्यात 2 दिवसात रुग्ण दुप्पट, शीघ्र कृती दल अलर्ट
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
Horoscope Today 23 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Income Tax Raid At Pushpa 2 Director House: 'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
'पुष्पा 2'च्या दिग्दर्शकाच्या अडचणी वाढल्या, घरावर इनकम टॅक्सची छापेमारी; सुकुमार यांना एअरपोर्टवर अडवलं
Maharashtra Weather: आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
आता उकाड्यासह घामाच्या धारा! राज्यात 48 तासांत तापमानात मोठे बदल, IMD चा इशारा काय?
Embed widget