Ind vs Aus 3rd Test : चुकीला माफी नाही... मोहम्मद सिराज-ट्रॅव्हिस हेडवर लागणार एका सामन्याची बंदी? ICC ॲक्शन मोडवर
Mohammed Siraj Travis Head : मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वादाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Mohammed Siraj Vs Travis Head : मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील वाद ब्रिस्बेन कसोटीपूर्वी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. खरं तर, ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 च्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांच्यातील जोरदार वादामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. मात्र सामन्यादरम्यान घडलेल्या या घटनेने खेळाच्या भावनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही घटना ॲडलेड कसोटीत घडली जेव्हा मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या 82व्या षटकात ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. विकेट घेतल्यानंतर सिराजने प्रेक्षकांकडे बोट दाखवत सेलिब्रेशन केले. ट्रॅव्हिस हेडला ही कृती आवडली नाही आणि तो सिराजला काहीतरी बोलला. यानंतर हेड पॅव्हेलियनमध्ये परतला असला तरी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी सिराजच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.
एका सामन्याची बंदी लागणार?
ॲडलेड कसोटीत घडलेल्या या घटनेनंतर 'द डेली टेलिग्राफ'च्या रिपोर्टमध्ये एक मोठी गोष्ट समोर आली आहे. या वृत्तानुसार, मोहम्मद सिराज आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनाही या घटनेसाठी आयसीसीकडून शिस्तभंगाची कारवाई करावी लागू शकते. अनेक क्रिकेट तज्ञ म्हणतात की, अशा घटनांमुळे सहसा कमी शिक्षा होते, त्यामुळे दोन्ही खेळाडूंवर निलंबनाची शक्यता कमी आहे.
The end of a sensational innings! 🗣️#AUSvIND pic.twitter.com/kEIlHmgNwT
— cricket.com.au (@cricketcomau) December 7, 2024
'प्लेअर ऑफ द मॅच' ठरलेल्या ट्रॅव्हिस हेड दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर म्हणाला होता की, मी सिराजला म्हणालो चांगला बॉल होता, पण त्याने याचा काहीतरी वेगळाच अर्थ घेतला. ते पाहून मी थोडा निराश झालो. आता जे आहे ते आहे. जर त्याला असे वागायचे असेल आणि स्वत:ला जगासमोर असे दाखवायचं असेल तर ठिके आहे.”
तर मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडचे विधान पूर्णपणे फेटाळून लावले आणि स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सिराज म्हणाला, "मी माझे सेलिब्रेशन करत होतो. पण त्याने माझ्याबद्दल वाईट शब्द वापरले, जे टीव्हीवरही स्पष्ट दिसत होते. क्रिकेट हा जेंटलमॅन्सचा खेळ आहे आणि आम्ही सर्वांचा आदर करतो. पण त्याने जे केले, ते बरोबर नव्हते."
पण तिसऱ्या दिवशी दोन्ही खेळाडूंमधील गोष्टी थंडावल्याचे दिसत होते. भारताच्या दुसऱ्या डावात जेव्हा मोहम्मद सिराज फलंदाजीला आला, तेव्हा तो आणि ट्रॅव्हिस हेड हसताना आणि बोलतांना दिसले. यावरून दोघांनीही वाद मागे टाकल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा -