Watch : मुंबईविरुद्ध सामन्यात जेमिमानं घेतली अफलातून कॅच, झेल घेताच दिली हटके रिएक्शन, पाहा VIDEO
Jemimah Rodrigues Catch : महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील 18 व्या सामन्यात दिल्ली संघाने मुंबई इंडियन्सला 9 विकेट्सनी मात दिली.
Mumbai Indians vs Delhi capitals WPL Match : महिला प्रीमियर लीग (WPL) स्पर्धेत आता अंतिम टप्प्यातील सामने खेळवले जात आहेत. साखळी टप्प्यात एकूण 20 लीग सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी 18 वा सामना सोमवारी रात्री (20 मार्च) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळला गेला. मुंबई आणि दिल्ली यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात असा अप्रतिम झेल पाहायला मिळाला, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले, स्वत: झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकाचाही यावर विश्वास बसेना. तर हा अफलातूनव झेल दिल्ली कॅपिटल्सची स्टर खेळाडू जेमिमा रॉड्रिग्सने (Jemimah Rodrigues) घेतला. तिच्या या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जेमिमा रॉड्रिग्सचा स्वतःवर विश्वास बसत नव्हता
जेमिमा रॉड्रिग्जच्या झेलचा हा व्हिडिओ WPL च्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'स्क्रीमर अलर्ट.' या व्हिडिओमध्ये मुंबई इंडियन्सची फलंदाज हेली मॅथ्यूज लेग साइडच्या दिशेने बॅट फिरवताना पाहू शकता. येथे जेमिमा रॉड्रिग्सने पळताना एक शानदार डाईव्ह टाकत अतिशय सुंदर पद्धतीने हा झेल पकडला. झेल घेतल्यानंतर जेमिमा लांबपर्यंत घसरत राहिली. या झेलनंतर जेमिमाने अशी प्रतिक्रिया दिली की जणू तिला तिच्याच झेलवर विश्वास बसत नाही. पहिल्या डावातील चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हा झेल पकडला गेला. दिल्लीकडून वेगवान गोलंदाज शिखा पांडे हे षटक टाकत होती. या कॅचमुळे मुंबई इंडियन्सची फलंदाज हेली मॅथ्यूजला 5 धावा करून स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
Screamer alert 🔥🔥
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 20, 2023
WHAT. A. CATCH from @JemiRodrigues 🙌🏻
Follow the match ▶️ https://t.co/Gcv5Cq5nOi#TATAWPL | #MIvDC pic.twitter.com/p4vlhHaYMI
9 विकेट्सनी दिल्ली कॅपिटल्स विजयी
प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केली. मुंबईच्या संघाला निर्धारित 20 षटकात आठ विकेट्सच्या मोबद्लायत फक्त 109 धावा करता आल्या. मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने दणक्यात सुरुवात केली. पहिल्या चेंडूपासून धावांचा पाऊस पाडला. शेफाली वर्माने अवघ्या 15 चेंडूत 33 धावांचा पाऊस पाडला. दिल्लीने पॉवरप्लेच्या सहा षटकात 67 धावांचा पाऊस पाडला होता. शेफाली वर्मा बाद झाल्यानंतर कर्णधार मेग लॅनिंग हिने एलिस केप्सीच्या मदतीने विजय मिळवून दिला. मेग लॅनिंग आणि एलिस केप्सी यांनी दुसऱ्या विकेटसाठी अवघ्या 25 चेंडूत 51 धावांची भागिदारी केली. शेफाली वर्मा, मेग लॅनिंग आणि एलिस केप्सी यांच्या विस्फोटक फलंदाजीमुळे दिल्लीने 110 धावांचे लक्ष 11 षटकात पूर्ण केले. मेग लॅनिंग हिने 22 चेंडूत 32 धावांची खेळी केली. तर केप्सीने 17 चेंडूत 38 धावांचा पाऊस पाडला.
हे देखील वाचा-