एक्स्प्लोर

ATP Rankings : 18 वर्षांत पहिल्यांदाच राफेल नदाल टॉप-10 रँकिंगमधून बाहेर, जाणून घ्या लेटेस्ट एटीपी रँकिंग

Rafael Nadal : राफेल नदाल एप्रिल 2005 पासून एटीपी रँकिंगमधील टॉप-10 खेळाडूंमध्ये आहे. यावेळी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत तो प्रथमच टॉप-10 मधून बाहेर पडला आहे.

Rafael Nadal ATP Rankings : अनुभवी टेनिसपटू राफेल नदाल (Rafael nadal) एटीपी क्रमवारीतील (ATP Rankings) टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. विशेष म्हणजे हा स्टार खेळाडू टॉप-10 मधून बाहेर पडण्याची गेल्या 18 वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. ताज्या क्रमवारीत त्याला 13वे स्थान मिळाले आहे. दुखापतीमुळे सतत विविध महत्त्वाच्या स्पर्धांमधून राफेल बाहेर राहिल्याने त्याला हा धक्का बसला आहे.

या वर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये राफेल नदालला दुसऱ्या फेरीतच बाहेर पडावे लागले होते. दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हापासून आजपर्यंत तो मैदानात परतू शकलेला नाही. असं मानलं जात आहे की तो मे महिन्यात सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनपूर्वी टेनिस कोर्टवर परतेल. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या मॉन्टे कार्लो मास्टर्समध्ये तो दिसू शकतो. राफेल नदाल हा सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष खेळाडू आहे. त्याने 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. अलीकडेच नोव्हाक जोकोविचने त्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या दोन खेळाडूंमध्ये टेनिस विश्वातील सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याची शर्यत आहे. या दोघांपैकी कोणीही मे महिन्यापासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ओपनमध्ये पुढे जाऊ शकतात.

फ्रेंच ओपनमध्ये नदालचं वर्चस्व 

फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदालने आजवर अफलातून कामगिरी केली आहे. त्याने 22 पैकी 14 ग्रँडस्लॅम जेतेपद फक्त फ्रेंच ओपनमध्ये जिंकले आहेत. त्याला या स्पर्धेत पराभूत करणं कोणालाही सोपं गेलेलं नाही. दरम्यान आता नदाल मेपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही, तर जोकोविचला ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या शर्यतीत पुढे जाण्याची संधी असेल.

राफेल नदालच्या नावावर 22 ग्रँडस्लॅम

फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जागतिक स्पेनच्या राफेल नदालनं जागतिक क्रमवारीत 8 क्रमांकाच्या नॉर्वेजियन कॅस्पर रुडचा पराभव केला. या विजयासह राफेल नदालनं चौदाव्यांदा फ्रेंच ओपनचं विजेतेपद जिंकलं. तर, 22वं ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावलं.

राफेल नदालची जबरदस्त कामगिरी

नदालनं 2005, 2006, 2007, 2008, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2017, 2018, 2019, 2020, 2022 मध्ये असं 14 वेळा फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली आहे. तर, 2009 आणि 2022 ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली.  याशिवाय, त्यानं 2008 आणि 2010 मध्ये वम्बिलडन आणि  2010, 2013, 2017, 2019 मध्ये यूएस ओपनचा खिताब जिंकला आहे.

2022 मध्ये नदालच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

स्पेनचा स्टार टेनिसपटू आणि 22 ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदालच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन झालंय. नदालची पत्नी मारिया फ्रान्सिस्का पेरेलोनं 8 ऑक्टोबरला आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. मारिया ही आई होणार असल्याची माहिती नदालनं जुलै महिन्यात दिली होती. नदाल वडील झाल्याची माहिती स्पॅनिश फुटबॉल क्लब रिअल माद्रिदनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे दिली होती.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Anna Hajare Ralegan Voting  : चारित्र्य बघून मतदान करा, अण्णा हजारेंचं मतदारांना आवाहनBajrang Sonwane On oppenent : विरोधकांकडून पैसै वाटले जातात, बजरंग सोनावणेंचा आरोपABP Majha Headlines : 10 AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  9  AM : 13 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, 87.90 टक्के विद्यार्थी पास; येथे पाहा निकाल
Pravin Tarde : बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
बोटाला शाई लावण्याअगोदर प्रवीण तरडेंचा पुणेकरांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Video: शिरुर मतदारसंघात राडा, व्हिडिओ शेअर करत अमोल कोल्हेंचा संताप; सर्वात कमी मतदान
Kareena Kapoor Saif Ali Khan Viral Video :  ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Video : ही असली कामे बेडरुममध्ये करा ना; सैफीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी भडकले
Chandrashekhar Bawankule : 'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
'मशाल अन् तुतारी चार जूननंतर राज्यात दिसणार नाही', चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
Beed Lok Sabha: पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
पंकजा मुंडेंनी सांगितली विचित्र योगायोगाची कथा, गोपीनाथ मुंडेंना अग्नी दिला त्याचदिवशी लागणार लोकसभेचा निकाल
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
मोठी बातमी : ठाण्यात सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीनतेरा; लोकल अद्यापही उशिराने
Lok Sabha Election Voting Maharashtra : राज्यात सुरुवातीच्या टप्प्यात नंदुरबारची आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
नंदुरबारची सुरुवातीच्या टप्प्यात आघाडी, जळगावसह रावेरमध्ये मतदानाची स्थिती काय? जाणून घ्या आकडेवारी
Embed widget