(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आधी अफगाण खेळाडूंसोबत भर मैदानात डान्स, आता घरी जेवणाला आमंत्रण, इरफान पठाणचा पाहुणचार चर्चेत
Rashid Khan : भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात आतापर्यत अफगाणिस्तान संघाने प्रभावी कामगिरी केली आहे.
World cup 2023 Irfan Pathan Rashid Khan : भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात (World Cup 2023) आतापर्यत अफगाणिस्तान संघाने प्रभावी कामगिरी केली आहे. अफगाणिस्तान संघाने पाकिस्तान (AFG vs PAK) आणि इंग्लंडसारख्या (ENG vs AFG) बलाढ्य संघाचा पराभव केला. अफगाणिस्तान संघ सेमीफायनसाठी (WC semi Final) स्पर्धेत आहे. अफगाणिस्तान संघाने सात सामन्यात आतापर्यंत चार विजय मिळवलेत. आज ऑस्ट्रेलियाविरोधात (AUS vs AFG) वानखेडे स्टेडिअमवर अफगाणिस्तान खेळत आहे. अफगाणिस्तान संघासाठी इरफान पठाण याने पार्टी आयोजन केले होते. अफगाणिस्तान संघातील खेळाडू आणि इरफान पठाण यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे. त्यामुळेच इरफान पठाण याने अफगाणिस्तान संघासाठी आपल्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. अफगाणिस्तान संघासोबत हरभजन सिंह, अदनान सामी आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनीही या पार्टीला उपस्थिती दर्शवली होती.
अदनान सामी याने एक्सवर (ट्विटर) इरफन पठाण याच्या घरातील पार्टीतील एक फोटो शेअर केलाय. इरफान पाठण याने अफगाणिस्तान संघासाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. या खास पार्टीसाठी सुनील शेट्टी, अदनान सामी, हरभजन सिंह आणि अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ उपस्थित होता. अदनान याने पार्टीतील फोटो पोस्ट करत लिहिले की, ''इरफान पठान याच्या घरी अफगाणिस्ताच्या संघासोबत शानदार वेळ गेलाय. प्रेम, हसणे, कबाब आणि काबुली पुलाव.... अदनान सामीच्या या पोस्टला ट्वीटरवर लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव पढत आहे. अनेकांनी ही पोस्ट शेअरही केली आहे.
पाहा नेमकी पोस्ट काय ?
A beautiful evening with the ‘gallant’ Afghan cricket team at @IrfanPathan ‘s home!
— Adnan Sami (@AdnanSamiLive) November 7, 2023
There were stories, love, laughter, Kebabs, ‘Shola’ & Qabuli Pulao in abundance!!
.#adnansami #cricket pic.twitter.com/R2cuEvlQAP
इरफान पठाणचा दोस्ताना -
भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पाठण याची अफगाणिस्तानच्या संघातील खेळाडूसोबत चांगली मैत्री आहे. अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भरमैदानात इरफान पठाण याने राशीदसोबत डान्स केला होता. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. इरफान पठाणने पार्टीसाठी राशिद खान, मोहम्मद नबी आणि नवीन उल हक यांच्यासोबत अफगाणिस्तानच्या सर्व संघाला आमंत्रित केले होते. या पार्टीसाठी इमरान ताहिर आणि हरभजन सिंह हे माजी खेळाडूही आले होते. या पार्टीमध्ये इरफानचा भाऊ यूसुफ पाठणही होता.
आणखी वाचा :
तर सेमीफायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत, पाहा नेमकं समीकरण