एक्स्प्लोर

Womens U19 T20 WC 2023: भारतीय महिला संघ विश्वचषकाच्या फायनलमध्ये, न्यूझीलंडवर 8 विकेट्स राखून मिळवला दमदार विजय

INDW vs NZW U-19 T20 WC: अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला 8 विकेट्स राखून मात दिली आहे.

Team India in WC : दक्षिण आफ्रिकेत सुरु 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने (Under 19 Womens Cricket Team) शेफाली वर्माच्या (Captain Shefali Verma) नेतृत्वाखाली फायनलमध्ये धडक दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रुम येथे झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड संघाला मात देत फायनल गाठली आहे. सामन्यात आधी उत्कृष्ट गोलंदाजी करुन न्यूझीलंडला 107 धावांत रोखून भारताने श्वेता शेहरावत हिच्या नाबाद 61 धावांच्या मदतीने सामन्यात विजय मिळवला आहे.

आजच्या सामन्याचा विचार करता भारताने भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. न्यूझीलंड संघाला स्वस्तात रोखून नंतर आक्रमक खेळाच्या जोरावर विजय मिळवण्याची भारताची रणनीती होती. जी यशस्वी देखील झाली. अवघ्या 107 धावाच न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत करु शकला. प्लिमर हिने सर्वाधिक 35 धावा यावेळेस केल्या. भारताकडून परश्वी चोप्राने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तितास सिद्धू, शेफाली वर्मा, मन्नत कश्यप, अर्चना देवी यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. ज्यानतर फलंदाजीला आलेल्या भारताने सुरुवातीपासून आक्रमक खेळ दाखवला. ज्यामुळे केवळ 14.2 षटकांत दोन विकेट्स गमावून भारताने 110 धावा करत 8 विकेट्सनी मॅच जिंकली. यावेळी श्वेता शेहरावत हिने नाबाद 61 धावांची तर शेफालीने 10 सौम्याने 22 आणि गोंगादी त्रिशाने नाबाद 5 धावांची खेळी केली. ज्यामुळे भारताने 8 विकेट्सने सामन्यात विजय मिळवला आहे.

न्यूझीलंडची विजयी साखळी तोडली

याआधी सुपर सिक्समध्ये करो या मरोच्या सामन्यातश्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत  उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं होतं. त्यात न्यूझीलंडचा महिला संघ 2023 च्या (New Zealand Team) अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत या सामन्याआधी यंदा एकही सामना पराभूत झाला नव्हता. गट सामन्यांपासून सुपर सिक्सपर्यंतचे सर्व सामने जिंकण्यात त्याला यश आले होते. न्यूझीलंडने इंडोनेशिया, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघांचा गट सामन्यात पराभव केला, तर सुपर सिक्समध्ये रवांडा आणि पाकिस्तानचाही पराभव केला. पण आज मात्र भारताने न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवत त्यांची विजयी घोडदौड रोखली आहे.  

भारतीय संघाची कामगिरी 

अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये (Under 19 Womens T20 World Cup) भारताची कामगिरीही (Team India) देखील चांगली झाली आहे. भारताचा संघ ड गटात होता. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. ज्यानंतर आता सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला मात देत थेट फायनल गाठली आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget