INDW vs SAW Final : टीम इंडियाचा डाव आटोपला, दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 110 धावाचं आव्हान
India vs South Africa: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यानंतर हरलीन देवोलच्या 46 धावांच्या जोरावर भारतानं 109 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.
Women's T20I Tri-Series in South Africa 2023 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) महिला संघात सुरु टी20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 109 धावा केल्या आहेत. ज्यामुळे आता विजयासाठी दक्षिण आफ्रिका संघाला 20 षटकांत 110 धावा करायच्या आहेत. भारताकडून हरलीन देवोल हिने (Harleen Deol) 46 धावांची एकहाती झुंज दिली इतर फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेने भारताचे 4 बॅटरच बाद केले असले तरी त्यांनी गोलंदाजी फार चांगली केल्याचं दिसून आलं.
Innings Break! @imharleenDeol top scored with 46 as #TeamIndia posted 109/4 on the board.
— BCCI Women (@BCCIWomen) February 2, 2023
Over to our bowlers now 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/wiyKk2LjmH #INDvSA pic.twitter.com/aJh9Sgb2QN
भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात T20 त्रिकोणी मालिका खेळवली जात आहे. यामध्ये टीम इंडियाने फायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मालिकेत भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पण अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजीत आणखी मोठ्या खेळीची अपेक्षा भारताकडून होती. अशामध्ये अनुभवी स्मृती शून्य जेमिमा 11 धावा करुन बाद झाल्या. हरलीन आणि हरमनप्रीतनं मात्र चांगली भागिदारी करत डाव सावरला. कर्णधार हरमनप्रीत 21 धावा करु शकली, तर हरलीननं 46 धावांचं योगदान दिलं. दीप्ती शर्माच्या नाबाद 16 आणि पुजा वस्त्रकरने नाबाद एक धाव करत भारताची धावसंख्या 109 पर्यंत नेली. आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 120 चेंडूत 109 धावांची गरज आहे.
दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन -
भारत : स्मृती मानधना, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, देविका वैद्य, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड, स्नेह राणा
दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्वार्ड, तझमिन ब्रिट्स, लारा गुडॉल, स्युने लुस (कर्णधार), क्लो ट्रायॉन, अॅनेरी डेर्कसेन, नदिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), शबनिम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा
भारताचा दमदार फॉर्म
या त्रिकोणी मालिकेतील भारताचा प्रवास अगदी वाखाणण्याजोगा होता. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 27 धावांनी पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा 56 धावांनी पराभव झाला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना निकालाविना राहिला. त्याचवेळी, यानंतर भारताने वेस्ट इंडिजचा आज पुन्हा पराभव केला. आज म्हणजेच 2 फेब्रुवारीला अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारत सामना खेळत आहे.
हे देखील वाचा-