Rishabh Pant : 'ऋषभ पंत बरा झाल्यानंतर कानाखाली मारायचीय', असं का म्हणाले कपिल देव
Rishabh Pant : दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतला कानाखाली मारण्याची इच्छा असल्याचं कपिल देव यांनी या कार्यक्रमात सांगितलं.
Rishabh Pant: क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला उत्तराखंडमधमध्ये भीषण अपघात झाला होता. त्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंतला डेहराडूनमधल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या मुंबईतील रुग्णालयात पंत उपचार घेत आहे. पण अपघातामुळे ऋषभ पंत टीम इंडियातून बाहेर गेलाय. त्याला टीम इंडियात परतण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो. टीम इंडियात ऋषभ पंतचं पुनरागमन सहजासहजी शक्य नाही... ऋषभ पंतबद्दल कपिल देव यांना एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला होता. दुखापतीतून सावरल्यानंतर ऋषभ पंतला कानाखाली मारण्याची इच्छा असल्याचं कपिल देव यांनी या कार्यक्रमात सांगितलं.
का असं म्हणाले कपिल देव?
ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. ज्या पद्धतीनं आई-वडील मुलांना चूक झाल्यावर कानाखाली लगावतात.. त्याच अधिकारानं पंत ठीक झाल्यानंतर कपिल देव यांनी त्याला कानाखाली मारायचं असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, "ऋषभ पंतवर माझं खूप प्रेम आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा. त्याची भेट घेऊन कानाखाली मारत स्वत:ची काळजी घ्यायला त्याला सांगायचं आहे. त्याला हेही सांगायचेही की तुझ्या अपघातामुळे संघ अडचणीत सापडला आहे. मी त्याच्यावर प्रेमही करतो अन् नाराजही आहे. सध्याचे तरुण अशा चुका का करतात? त्यामुळे मला त्याला कानाखाली लावायची आहे."
ऋषभ पंत लवकर बरा व्हावा अन् टीम इंडियात पुनरागमन करावं. त्याला माझा नेहमीच आशीर्वाद अन् प्रेम असेल. पण चुकणाऱ्या मुलाला समजावण्याची आई वडिलांची जबाबदारी आहे, त्यामुळेच त्याला कानाखाली मारुन स्वत:ची काळजी घे, असं सांगायचं आहे, असे कपिल देव म्हणाले.
Via - #Uncut#Viral: Kapil Dev क्यों मारना चाहते हैं Rishabh Pant को "थप्पड़"?
— Santosh Poudyal | ਸੰਤੋਸ਼ | سنتوش (@DigitalSantoshP) February 8, 2023
Full Video on ABP Uncut: https://t.co/BhuZwdRpzK@therealkapildev @tweetchayan#KapilDev #RishabhPant #Cricket #TeamIndia pic.twitter.com/Cdu3kpGrs8
बॉर्डर-गावस्कर मालिका भारतच जिंकेल - कपिल देव
उद्यापासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्याबद्दलच्या चर्चेसाठी कपिल देव यांना एबीपी न्यूजच्या एका कार्यक्रमात बोलवण्यात आले होते. त्यावेळी टीम इंडियाच्या कामगिरीवर अन् ऋषभ पंत यांच्यावर त्यांनी भाष्य केलं. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी सलामीला यावं, असं कपिल देव यांनी सांगितलं. त्याशिवाय, रविंद्र जाडेजाचेही त्यांनी कौतुक केले. तसेच बॉर्डर गावस्कर मालिकेवर टीम इंडियाचं वर्चस्व असेल, असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे.
पाहा संपूर्ण मुलाखत