Jay Shah On Rishabh Pant: ऋषभ पंतच्या कुटुंबीयांशी आणि डॉक्टरांशी बोलणं झाल्यानंतर जय शाहांचं ट्वीट, काय म्हणाले?
Rishabh Pant Car Accident: भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला अपघात झाल्यानं क्रिडाविश्वात खळबळ माजली.
Rishabh Pant Car Accident: भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला अपघात झाल्यानं क्रिडाविश्वात खळबळ माजली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या सुरक्षेसाठी क्रिकेटपटू आणि चाहते प्रार्थना करत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ऋषभ पंतच्या कुटुंबीयांशी आणि डॉक्टरांशी संपर्क साधून त्याच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.
"ऋषभ पंतच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी आम्ही प्रार्थना करत आहोत. माझं त्याच्या कुटुंबीयांशी आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी बोलणं झालंय. ऋषभची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आम्ही देखी त्याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. तसेच त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य करू", अशा आशायाचे ट्वीट जय शाह यांनी केलंय.
जय शाह यांचं ट्वीट-
My thoughts and prayers are with Rishabh Pant as he fights his way back to recovery. I have spoken to his family and the doctors treating him. Rishabh is stable and undergoing scans. We are closely monitoring his progress and will provide him with all the necessary support.
— Jay Shah (@JayShah) December 30, 2022
ट्वीट-
Wishing dear @RishabhPant17 a super speedy recovery. Bahut hi Jald swasth ho jaao.
— Virender Sehwag (@virendersehwag) December 30, 2022
ट्वीट-
Did I am hearing correct news of @RishabhPant17
— Munaf Patel (@munafpa99881129) December 30, 2022
Praying for sppedy recovery to #RishabhPant#DriveSafe pic.twitter.com/X6MJLfANMj
ट्वीट-
Thinking about Rishabh Pant this morning and desperately hoping he is fine and recovers soon.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) December 30, 2022
कारवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात
भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत कारला भीषण अपघात झालाय. दिल्लीहून घरी येत असताना त्याच्या कारला अपघात झालाय. यामध्ये ऋषभ गंभीर जखमी झाल्यानं त्याला तातडीनं देहरादून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कार चालवताना अचानक झोप लागल्यानं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं पंतनं सांगितलं.
पंतच्या अपघातानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतच्या अपघातानंतर अधिकाऱ्यांना त्याच्या उपचारासाठी सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश दिलेत. गरज पडल्यास त्याच्यासाठी एअर अॅम्ब्युलन्सचीही सेवा पुरवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.
हे देखील वाचा-