MS Dhoni: लंडनमध्ये धोनीसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची धडपड, पाहा व्हिडिओ
Mahendra Singh Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Mahendra Singh Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, अजूनही त्याची फॅन फॉलोइंग तितकीच आहे. भारतातच नव्हे तर, जगभरात त्याचे चाहते आहेत. सध्या सोशल मीडियावर धोनीचा लंडनमधील (London) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यात चाहते त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये धोनी लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. त्याच्यासोबत त्याचे अनेक त्याला फॉलो करताना दिसत आहेत. एवढेच नव्हे तर, धोनीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते त्याच्या मागे धावत आहेत, असं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
व्हिडिओ-
धोनी सध्या इंग्लंडमध्ये आहे. भारत-इंग्लंड सामन्यादरम्यानही तो स्टेडियममध्ये दिसला होता. बीसीसीआयनं त्याचे काही फोटोही शेअर केले होते, ज्यामध्ये तो भारतातील युवा खेळाडू आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना दिसत होता.
धोनीनं अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना 9 जुलै रोजी 2019 मॅनचेस्टर न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्यानं 15 ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीच्या 10 हजारांहून अधिक धावांची नोंद आहे. क्रिकेटविश्वातील उत्कृष्ट आणि यशस्वी फलंदाजांमध्ये धोनीची गणना होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतानं टी-20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी यांसारखे विजेतेपद पटकावलंय. आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे. सध्या धोनी आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करत आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईनं चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे.
हे देखील वाचा-
- IRE vs NZ: 361 धावांचं लक्ष्य अन् फक्त एका धावानं पराभव, आयर्लंडची न्यूझीलंडला टफ फाईट!
- World Athletics Championships: मुरली श्रीशंकरची ऐतिहासिक कामगिरी; पुरुषांच्या लाबं उडी फायनलसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय
- Singapore Open: पीव्ही सिंधूची सिंगापूर ओपनच्या अंतिम फेरीत धडक, सेमीफायनलमध्ये सेईना कावाकामीला नमवलं