Virat Kohli’s New Phone : विराटचा फोन हरवल्यावर ट्वीटरवर भन्नाट रिस्पॉन्स.. 'नथिंग' म्हणतं आम्ही देतो नवा फोन..
Virat Kohli : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा नवाकोरा फोन अनबॉक्सिंग करण्याआधीच हरवल्याची बातमी त्याने स्वत: ट्वीट शेअर करत दिली ज्यानंतर अनेक भन्नाट रिप्लाय या ट्वीटवर येताना दिसत आहेत.
Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा नवा-कोरा फोन हरवल्याची माहिती त्याने स्वत: ट्वीट शेअर करत दिली. विराटचं हे ट्वीट अगदी काही वेळातच तुफान व्हायरल झालं, ज्यानंतर नेटकऱ्यांसह अनेक बड्या कंपन्यांनी देखील रिप्लाय केला आहे. यात खासकरुन झोमॅटो, टाटा, झी5 अशा काहींचे रिप्लाय देखील व्हायरल होत आहेत. विराटनं ट्वीटमध्ये लिहिलं की, 'तुमचा नवा फोन बॉक्समधून काढण्यापूर्वीच हरवणं, याहून वाईट काहीच नसेल, कोणी माझा फोन पाहिला का?'
विराटचं ट्वीट-
Nothing beats the sad feeling of losing your new phone without even unboxing it ☹️ Has anyone seen it?
— Virat Kohli (@imVkohli) February 7, 2023
दरम्यान विराटच्या या ट्विटवर येणाऱ्या रिप्लायमध्ये झोमॅटोने लिहिलं आहे की, 'तुम्ही हवंतर आमच्याकडून आईसस्क्रीम मागवू शकता, वहिनींचा (Anushka Sharma) फोन यासाठी तुमची मदत करु शकतो. झोमॅटोच्या रिप्लायवर इतरही नेटकऱ्यांनी भन्नाट रिप्लाय दिले आहेत. तर टाटा निओने रिप्लायमध्ये लिहिलं आहे की, जे होणार असेल त्याला आपण काही करु शकत नाही, पण आम्हाला कोणता फोन होता ते थेट मेसेज करुन सांगा आमच्याकडे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर नथिंग या नव्याने मार्केटमध्ये आलेल्या मोबाईल कंपनीनेही विराटला फोन देऊ केला आहे.
feel free to order ice cream from bhabhi's phone if that will help 😇
— zomato (@zomato) February 7, 2023
तुम बस हमेशा खाने पीने की ही बात करो
— Shyam Tyagi (@IamShyamTyagi) February 7, 2023
Drop us a DM, we have one waiting for you 🖤
— Nothing (@nothing) February 7, 2023
We feel you. Losing your unboxed phone is the worst 😫but jaane wale ko kaun rok sakta hai bhala! Let us know which phone was it in DM and we'd love to send a surprise to you. 😇-Team Tata Neu
— Tata Neu (@tata_neu) February 7, 2023
याशिवाय एका युजरने मिश्किलपणे लिहिलं आहे, आता यामुळे का होईना खेळावर लक्ष लागून राहिल. तर अनेक नेटकरी हा एखादा स्टंट असून एखाद्या फोनच्या जाहिरातीचा याशी संबंध असेल असं म्हटलं जात आहे.
Chalo isi bahane khel par man lga rhega
— Nishant Bharti (@nishantbharti23) February 7, 2023
So next tweet will be your New phone by a brand.... Ad campaigns these days ... King kohli 😂
— RJ ALOK (@OYERJALOK) February 7, 2023
हे देखील वाचा-