IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये स्मिथ की कोहली कोणाचा जलवा? जाणून घ्या दोघांची आकडेवारी
Border–Gavaskar Trophy : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने एकूण 20 सामने खेळले आहेत आणि स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत 14 सामने खेळले आहेत.
![IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये स्मिथ की कोहली कोणाचा जलवा? जाणून घ्या दोघांची आकडेवारी Steve Smith and virat kohlis border gavaskar trophy stats know who is better in ind vs aus test series know details IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये स्मिथ की कोहली कोणाचा जलवा? जाणून घ्या दोघांची आकडेवारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/07/2e337980c0e9d80e9fe134574eb5fb3d1675783094069323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Border–Gavaskar Trophy, Kohli vs Smith : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavskar Trophy) सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात होणार आहे. दरम्यान ही मालिका दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तसंच या मालिकेत दोन्ही संघांच्या काही खास खेळाडूंवर सर्वांची नजर असेल. यामध्ये टीम इंडियाच्या आशा मोठ्या प्रमाणात भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि ऑस्ट्रेलियाच्या आशा स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्यावर असणार आहेत.
एकीकडे विराट कोहली गेल्या तीन वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये फ्लॉप दिसत आहे, तर दुसरीकडे स्टीव्ह स्मिथ उत्कृष्ट लयीत दिसत आहे. पण आजवरचा विचार केल्यास बॉर्डर-गावस्कर मालिकेत खेळताना या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. पण यामध्ये स्टीव्ह स्मिथ किंग कोहलीच्या पुढे दिसत आहे. या मालिकेत कमी सामने खेळताना स्मिथने कोहलीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचवेळी त्याची फलंदाजीची सरासरीही कोहलीच्या खूप पुढे आहे. तर बॉर्डर-गावस्कर या दोन्ही मालिकेतील आतापर्यंतचे आकडे जाणून घेऊया...
विराट कोहली
बॉर्डर-गावस्कर मालिकेत विराट कोहलीने आतापर्यंत एकूण 20 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 36 डावांमध्ये त्याने 48.05 च्या सरासरीने 1682 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 7 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकूण 190 चौकार आणि 5 षटकार निघाले आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या 169 आहे.
स्टीव्ह स्मिथ
बॉर्डर-गावस्कर मालिकेत स्मिथने आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 28 डावांमध्ये त्याने 72.85 च्या सरासरीने एकूण 1742 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 8 शतके आणि 5 अर्धशतके केली आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकूण 185 चौकार आणि 9 षटकार निघाले आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या 192 आहे.
कोहली पुन्हा लयीत
विराट कोहलीनं नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज खेळी केली. या सामन्यात त्याने 110 चेंडूत 166* धावा केल्या. त्यानं हे शतक ठोकत आपली 73 आंतरराष्ट्रीय शतकं पूर्ण केली असून त्याचं हे 46 व एकदिवसीय शतक होतं. त्याच्या खेळीत एकूण 13 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 150.91 होता. कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शतकं झळकावली. गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले होते.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)