Kohli T20 Rankings: विराट कोहलीची आंतराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत मोठी झेप; सूर्यकुमार, रोहित शर्मा कितव्या क्रमांकावर?
Kohli T20 Rankings: आयसीसीनं जाहीर केलेल्या टी-20 क्रमावारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतोय.
Kohli T20 Rankings: आयसीसीनं (ICC) जाहीर केलेल्या टी-20 क्रमावारीत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतोय. नुकतीच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धत (Asia Cup 2022) दमदार प्रदर्शन करणाऱ्या विराटला 'प्लेअर ऑफ टूर्नामेन्ट' म्हणून गौरवण्यात आलं. ज्याचा फायदा त्याला मिळाला. जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या विराट कोहलीनं टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत 14 स्थानांनी झेप घेतली असून तो 15व्या स्थानावर पोहोचलाय.
आयसीसी टी-20 क्रमवारीत भारताचा युवा आणि मधल्या फळीचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चौथ्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 14 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा विकेटकिपर फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तसेच दिर्घकाळापासून टी-20 अव्वल स्थानावर कब्जा केलेल्या पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची (Babar Azam) तिसऱ्या क्रमांकावर घसरण झालीय. तर, दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्कराम (Aiden Markram) दुसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.
आयसीसी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत भुवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) एका स्थानानं नुकसान झालंय. भुवनेश्वर कुमारची सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर घसरण झालीय. ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवुड (Josh Hazlewood) आयसीसी टी-20 गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर, आयसीसी टी-20 ऑलराऊंडरच्या यादीत बांगालादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) पहिल्या क्रमांकावर आहे. तर, अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर मोहम्मद नबी (Mohammad Nabi) दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचीही (Hardik Pandya) एका स्थानानं घसरण झालीय. तो सातव्या क्रमांकावर पोहचलाय.
आयसीसीचं ट्विट-
टी-20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघाची घोषणा
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.
हे देखील वाचा-