IPL 2023: मुंबई इंडियन्सच्या 'त्या' निर्णयानंतर महिला जयवर्धनेंकडून प्रशिक्षकपदाचा राजीनामा
IPL 2023: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या सोळाव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघातून मोठी बातमी समोर आलीय.
IPL 2023: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या सोळाव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) संघातून मोठी बातमी समोर आलीय. मुंबई इंडियन्सच्या संघाचे मुख्य प्रशिक्षक महिला जयवर्धनेनं (Mahela Jayawardene) मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिलाय. मुंबई इंडियन्सच्या संघानं त्यांच्यावर नवी जबाबदारी सोपवल्यानं महिला जयवर्धनेनं हा निर्णय घेतलाय. महिला जयवर्धनेंची हेड ऑफ परफॉरमन्स पदी नियुक्ती करण्यात आलीय. यापुढं जयवर्धनें मुंबई फ्रँचायझीच्या 3 संघांच्या प्रदर्शनाला सुधारण्याचे काम पाहतील.
महिला जयवर्धने अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळत होते. परंतु,रिलायन्स इंडस्ट्रीजनं संयुक्त अरब अमिरात आणि दक्षिण आफ्रिकेतल्या टी-20 लीगमध्येही आपला संघ उतरवण्याचा निर्णय घेतलाय. यूएईतल्या टी-20 लीगमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची एमआय एमिरेट्स आणि दक्षिण आफ्रिकेतल्या लीगसाठी एमआय केपटाऊन हे संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्ससह एमआय इमिरेट्स एमआय केपटाउन या तिन्ही संघाच्या प्रदर्शनात सुधरणा करण्याची जबाबदारी जयवर्धने यांच्यावर सोपवण्यात आलीय.
ट्वीट-
जहीर खान यांच्यावरही मोठी जबाबदारी
महिला जयवर्धने यांच्याव्यतिरिक्त भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यांच्यावरही मुंबईच्या तिन्ही फ्रँचायझीचे ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. जो खेळाडूंच्या विकासासाठी जबाबदार असेल. याशिवाय, खेळाडूंची प्रतिभा ओळखणं आणि एमआयसाठी एक मजबूत संघ तयार करणे, यासाठी जहीर खान काम करेल. झहीरची ही भूमिका जगभरातील एमआयच्या संघांना मदत करण्यात महत्त्वाची ठरेल.
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ
मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळण्यात आला. तेव्हापासून आतापर्यतं आयपीएलच्या 15 वेळा स्पर्धा पार पडल्या आहे. यापैकी मुंबई इंडियन्सच्या संघानं सर्वाधिक 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकलाय. मुंबईनंतर आयपीएलचे सर्वाधिक खिताब जिंकणाऱ्या संघाच्या यादीत चेन्नई सुपर किग्ज दुसऱ्या क्रमांकावर आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं आतापर्यंत 4 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकलीय. आयपीएलप्रमाणे संयुक्त अरब अमिरात आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या टी-20 लीगमध्ये छाप सोडण्यासाठी मुंबई फ्रँचायझी सज्ज झालीय.
हे देखील वाचा-