आजारी असताना विराटने झळकावलं शतक, अनुष्का शर्माची पोस्ट चर्चेत
IND vs AUS 4th Test : अहमदाबाद कसोटी सामन्यात विराट कोहलीने संयमी दीडशतकी खेळी केली. तब्बल तीन वर्षानंतर विराट कोहलीने कसोटीत शतक झळकावले.
Anushka Sharma On Virat Kohli Century, IND vs AUS 4th Test : अहमदाबाद कसोटी सामन्यात विराट कोहलीने संयमी दीडशतकी खेळी केली. तब्बल तीन वर्षानंतर विराट कोहलीने कसोटीत शतक झळकावले. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर सोशल मीडियावर त्याचं कौतुक होतेय. पण शतक झळकावताना विराट कोहली आजारी असल्याचे समोर आले आहे. पत्नी अनुष्काने विराट कोहलीच्या शतकानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये विराट कोहली आजारी होता, असं तिने म्हटलेय. अनुष्काच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर कोहलीच्या विराट शतकाची चर्चा सुरु झाली आहे.
विराट कोहलीने 364 चेंडूचा सामना करताना संयमी 186 धावांची खेळी केली. पण सामन्यापूर्वी विराट कोहली आजार होता. याचा खुलासा पत्नी अनुष्का शर्माने इन्स्टा स्टोरीद्वारे केला आहे.
विराट कोहलीने 75 वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. कसोटीतील 28 व्या शतकासाठी विराट कोहलीला तीन वर्षांची वाट पाहावी लागली. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर अनुष्का शर्माने विराटसाठी इन्स्टावर खास पोस्ट केली. आहे. विराट कोहलीचा फोटो पोस्ट करत अनुष्का शर्माने लिहिले की, आजारपणातही चांगला खेळलास. तू मला नेहमी प्रेरणा देतोस...
Instagram post by Anushka Sharma about King Kohli. pic.twitter.com/0CV7QK9rMD
— Johns. (@CricCrazyJohns) March 12, 2023
अहमदाबाद येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 571 धावा केल्या. विराट कोहली आणि शुभमन गिल यांची शतके हे या डावाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरले. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने बिनबाद 3 धावा केल्या आहेत. सोमवारी या कसोटीचा अखेरचा दिवस आहे.
1205 दिवसानंतर विराट कोहलीने कसोटीत शतक झळकावले. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाविरोधात आपली सर्वोच्च धावसंख्याही केली. विराट कोहलीने क्लार्क आणि हाशिम आमला यांचा विक्रम मोडला. विराट कोहलीने कसोटी सर्वात वेगात 28 शतके झळकाण्यात क्लार्क आणि आमला यांना मागे टाकले. क्लार्कने 198 व्या डावात 28 शतके झळकावली होती. तर 183 व्या डावात आमलाने 28 शतके झळकावली होती. हा विक्रम विराटने मोडीत काढला. दरम्यान, याआधी विराट कोहलीने अखेरचं कसोटी शतक बांगलादेशविरुद्ध नोव्हेंबर 2019 मध्ये ठोकलं होतं. त्यानंतर थेट आता त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्च 2023 मध्ये शतक ठोकलं आहे. विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही गेल्या 20 कसोटी डावांमध्ये खूपच खराब होती. ज्यामध्ये त्याने केवळ 25 च्या सरासरीने धावा केल्या होत्या.
दरम्यान, 2022 आशिया चषकात विराट कोहलीने टी20 मध्ये शतक झळकावले होते. टी20 मधील विराट कोहलीचे हे पहिलेच शतक होय...विराट कोहलीने 61 चेंडूत 122 धावांची खेळी केली होती. 2023 मध्ये विराट कोहलीने वनडेतही शतक झळकावले होते. श्रीलंकाविरोधात कोहलीने 166 धावांची नाबाद खेळी केली होती.