IND vs AUS | कोहली अन् पांड्याकडून बायो-बबलचं उल्लंघन?; फोटो व्हायरल
India vs Australia : बायो-बबलचे नियम मोडल्याबद्दल बीसीसीआय कोहली आणि पांड्यावर दंड लावू शकते. अद्याप बीसीसीआय किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
India vs Australia : ऑस्ट्रेलिया दौर्यावर असलेली टीम इंडिया नव्या अडचणीत सापडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियामध्ये कोविड 19 च्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यातच टीम इंडियाच्या पाच खेळाडूंनी बायो बबलचे नियम मोडल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता भारतात परतण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी बायो बबलचे नियम मोडल्याचे समोर आलं आहे.
सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या अहवालानुसार, भारतात परतण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांनी कोरोना नियमांचे पालन न करता लहान मुलांच्या दुकानात (बेबी शॉप) गेले होते. यावेळी या दोन्ही खेळाडूंनीही मास्क देखील घातला नसल्याचं समोर आलं आहे.
8 डिसेंबरला शेवटचा टी 20 सामना खेळवला होता
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर असताना केवळ वनडे आणि टी-20 मालिकेत सहभागी होता. तर विराट कोहली कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटीपर्यंतच भारतीय संघाबरोबर होता. महत्त्वाची बाब म्हणजे टी-20 मालिकेचा शेवटचा सामना 8 डिसेंबर रोजी खेळला होता. अशा परिस्थितीत हे स्पष्ट होतय, की टी-20 मालिकेच्या दरम्यान कोहली आणि पांड्या कोरोनाचे नियम तोडत बेबी शॉपमध्ये गेले होते.
बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोहली-पांड्याला दंड?
बायो-बबलचे नियम मोडल्याबद्दल बीसीसीआय कोहली आणि पांड्यावर दंड लावू शकते. अद्याप बीसीसीआय किंवा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासंदर्भात कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. पण हे स्पष्ट आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलिया या दोन खेळाडूंना शिक्षा देऊ शकत नाही, कारण हे खेळाडू त्याचे कर्मचारी नाहीत.
खुशखबर! बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन केलेले पाच खेळाडू तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार
टीम इंडियाच्या रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनी या पाच खेळाडूंनी बायो बबलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं दिसून आले आहे. यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या जैवसुरक्षा नियमांचा भंग केल्याप्रकरणी या खेळाडूंना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. असं असलं तरी देखील हे खेळाडू तिसऱ्या कसोटीत खेळू शकणार आहेत. मेलबर्नमधील एका रेस्टॉरंटमध्ये या पाच खेळाडूंच्या जेवणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यानंतर बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपला तपास सुरू करत या पाचही खेळाडूंना अलगीकरणात पाठवलं होतं.