Viral Video: फिल्डिंगदरम्यान टीम डेव्हिडची पँटच निसटली! मग पुढे काय झालं? पाहा व्हिडिओ
Viral Video: आयपीएलमध्ये खळबळ माजवल्यानंतर टीम डेव्हिड आता इंग्लिश क्रिकेटमध्येही आपला जलवा दाखवत आहे. दरम्यान, व्हिटॅलिटी टी-20 ब्लास्टमध्ये टिम डेव्हिडनं वूस्टरशायरविरुद्ध तुफानी खेळी केली.
Viral Video: आयपीएलमध्ये खळबळ माजवल्यानंतर टीम डेव्हिड आता इंग्लिश क्रिकेटमध्येही आपला जलवा दाखवत आहे. दरम्यान, व्हिटॅलिटी टी-20 ब्लास्टमध्ये टिम डेव्हिडनं वूस्टरशायरविरुद्ध तुफानी खेळी केली. लँकेशायरकडून खेळायला आलेल्या डेव्हिडनं अवघ्या 25 चेंडूत 60 धावा केल्या. ज्यात चार चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. डेव्हिडच्या वादळी खेळीमुळे लँकेशायरला हा सामना 12 धावांनी जिंकता आला. या सामन्यात एक रंजक दृश्य पाहायला मिळालं. फिल्डिंगदरम्यान, टीम डेव्हिडची पँट निसटली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
वूस्टरशायरविरुद्ध सामन्यात टीम डेव्हिडसोबत एक मजेदार घटना घडली. या सामन्यादरम्यान चौकार वाचवण्याच्या टीम डेव्हिडची पँटच निसटली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पंजाब किंग्जचा फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनही टीम डेव्हिडच्या संघात आहे. या सामन्यात लियामनं 21 चेंडूत 26 धावा केल्या आहेत.
लँकेशायरचा वूस्टरशायरवर 12 धावांनी विजय
टी-20 ब्लास्टमध्ये लँकेशायर आणि वूस्टरशायर यांच्यात सामना झाला. या सामन्यात लँकेशायरने प्रथम फलंदाजी करताना 183 धावा केल्या. यादरम्यान टीम डेव्हिडनं संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली. या सामन्यात लँकेशायरनं वूस्टरशायरसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात वूस्टरशायरचा संघ 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 171 धावाच करू शकला. लँकेशायरकडून शानदार गोलंदाजी करताना रिचर्ड ग्लेसननं चार षटकात 33 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या.
आयपीएलमध्ये टीम डेव्हिडची कामगिरी
आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने टीम डेव्हिडला 8.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. टीम डेव्हिड गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा भाग होता. टीम डेव्हिडनं आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी शानदार खेळ दाखवला. सुरुवातीला दोन सामने खेळल्यानंतर डेव्हिडला मुंबई संघानं वगळलं होतं. त्यानंतर डेव्हिडनं शानदार पुनरागमन केलं. डेव्हिडनं आयपीएल 2022 मध्ये 8 सामन्यात 37.20 च्या सरासरीनं 186 धावा केल्या. यादरम्यान डेव्हिडचा स्ट्राईक रेट 216.27 होता. डेव्हिडच्या खेळीमुळं दिल्ली कॅपिटल्सला आयपीएलमधील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावं लागलं होतं.
टीम डेव्हिडची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
डेव्हिड हा ऑस्ट्रेलियन वंशाचा खेळाडू असून त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिंगापूरचं प्रतिनिधित्व केलं आहे. डेव्हिडनं 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 158 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं 558 धावा केल्या आहेत. आयपीएलशिवाय डेव्हिडनं बीबीएल आणि पाकिस्तान सुपर लीगमध्येही भाग घेतला आहे.
व्हिडिओ-
हे देखील वाचा-
- IPL चॅम्पियनलाला 20 कोटी, जगभरातील इतर टी 20 लीगमध्ये विजेत्याला किती रक्कम?
- Gujarat Titans Felicitated: गुजरातचे मुख्यमंत्री आयपीएल विजेत्या संघाला भेटले, कर्णधाराला दिली खास भेटवस्तू
- IPL 2022 : आयपीएलसाठी काम करणाऱ्या ग्राऊंड्समनला 25 लाखांचे बक्षीस, बीसीसीआयचा मोठा निर्णय