IND U19 vs AUS U19 : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा धमाका, 6 षटकारांसह तुफान खेळी, कर्णधार आयुष म्हात्रेचा पुन्हा भोपळा!
Vaibhav Suryavanshi IND U19 vs AUS U19 Update News : भारतीय अंडर-19 संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये शानदार खेळी खेळली.

Vaibhav Suryavanshi IND U19 vs AUS U19 Update News : भारतीय अंडर-19 संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये शानदार खेळी खेळली. अवघ्या 14 वर्षांचा असलेला हा खेळाडू याआधी इंग्लंड दौर्यावर धडाकेबाज कामगिरी करून आला होता, आणि आता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा पण त्याने चांगलाच समाचार घेतला. वैभवने केवळ 68 चेंडूत 70 धावांची खेळी केली. या डावात त्याने 6 गगनचुंबी षटकार आणि 5 चौकार ठोकत नवा विक्रम आपल्या नावावर केला.
कर्णधार आयुष म्हात्रेचा पुन्हा भोपळा! (Captain Ayush Mhatre fails IND U19 vs AUS U19 Update)
ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात खुपच खराब झाली. कर्णधार आयुष म्हात्रे पहिल्याच षटकात शून्यावर माघारी परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशीने दुसरा सलामीवीर विहान मल्होत्रासोबत करत दुसऱ्या गड्यासाठी 117 धावांची भागीदारी केली. अखेर 19व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. शतक हुकलं असलं तरी त्याची ही खेळी प्रेक्षकांच्या मनात कोरली गेली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत 300 धावा केल्या.
वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुन्हा धमाका (Vaibhav Suryavanshi IND U19 vs AUS U19 Update)
वैभव सूर्यवंशीने आतापर्यंत यूथ वनडेमध्ये तब्बल 41 षटकार ठोकले आहेत. यामुळे त्याने माजी अंडर-19 विश्वविजेता कर्णधार उन्मुक्त चंदचा विक्रम मागे टाकला. उन्मुक्तने 38 षटकार मारले होते, पण वैभवने फक्त 10 डावांतच हा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियात त्याने पहिल्यांदाच अर्धशतक ठोकत नवा टप्पा पार केला. पहिल्या वनडेमध्ये त्याने 22 चेंडूत 38 धावा केल्या होत्या. आजवरच्या यूथ वनडेमध्ये वैभवने 540 धावा केल्या आहे आणि तब्बल 26 टक्के धावा त्याने फक्त चौकार-षटकारांतूनच केल्या आहेत. त्यात 41 षटकारांचा समावेश आहे.
वैभवच्या नावावर आधीच अनेक विक्रम आहे. रणजी ट्रॉफीत त्याने वयाच्या केवळ 12 वर्षे 284 दिवसांचा असताना पदार्पण केले होते आणि सर्वात लहान वयात खेळणारा क्रिकेटपटू ठरला. यूथ वनडेमधील सर्वात जलद शतकाचाही मान त्याच्याच नावावर आहे. त्याने फक्त 52 चेंडूत शतक ठोकले आहे.
इंग्लंड अन् आयपीएलमध्येही धमाका
फक्त 14 वर्षांचा असूनही वैभवने इंग्लंड दौर्यावरही तुफानी कामगिरी केली. त्याने पाच यूथ वनडे सामन्यांत 355 धावा ठोकल्या. आयपीएलमध्येही त्याने इतिहास रचला. 28 एप्रिल 2025 रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने केवळ 35 चेंडूत शतक ठोकलं. आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर गेला. त्याच्यापुढे फक्त ख्रिस गेल आहे, ज्याने 30 चेंडूत शतक ठोकलं होतं.
हे ही वाचा -





















