Umpire Anil Chaudhary On Sanju Samson Catch: संजू सॅमसनने घेतलेली कॅच बघताच...; अंपायर अनिल चौधरींच्या विधानाची चर्चा, काय म्हणाले?
Umpire Anil Chaudhary On Sanju Samson Catch: फखर झमान बाद नव्हता, असा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणावर माजी पंच अनिल चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Umpire Anil Chaudhary On Sanju Samson Catch: आशिया चषक (Asia Cup 2025) स्पर्धेत 21 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सुपर-4 चा सामना खेळवण्यात आला. या सामन्यातील फखर झमानच्या (Fakhar Zaman) कॅचबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. टीव्ही अंपायर रुचिरा पल्लियागुरुगे यांनी चुकीच्या पद्धतीने फखर झमानला बाद घोषित केले. फखर झमान बाद नव्हता, असा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून करण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणावर माजी पंच अनिल चौधरी (Umpire Anil Chaudhary) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
क्रिकेटमध्ये ही जुनी परंपरा आहे. मी कोणत्याही विशिष्ट संघाचा उल्लेख करत नाहीये, पण एक संघ 100 धावांनी हरतो आणि नंतर म्हणतो की, पंचाने चुकीचा वाईड दिला. दुसरा अँगल पाहता आला असता. परंतु प्रत्येक पंचाची समाधानी राहण्याची स्वतःची पद्धत असते आणि रुचिरा पल्लियागुरुगे देखील संजू सॅमसनच्या झेलबाबत समाधानी होते. चेंडू जमिनीला स्पर्श केल्याचा कोणताही स्पष्ट पुरावा नव्हता. मीही संजू सॅमसनचा झेल एकदा पाहिल्यानंतर फखर झमान बाद असल्याचे स्पष्ट झाले.
#WATCH | Delhi | On PCB reportedly filing ICC complaint over Sanju Samson’s catch to dismiss Fakhar Zaman in IND vs PAK Super 4 match, Former Cricket Umpire, Anil Chaudhary, says, "This is an old tradition in cricket... I'm not referring to any specific team, but a team will lose… pic.twitter.com/T18Az17Sog
— ANI (@ANI) September 24, 2025
नेमकं प्रकरण काय? (Sanju Samson Caught Fakhar Zaman)
हार्दिक पांड्याच्या षटकातील तिसरा चेंडू फखरच्या बॅटच्या कडेला लागला. संजू सॅमसनने झेल घेतला. कॅचबद्दल मैदानावरील पंचांना शंका होती. त्यामुळे त्यांनी निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवला. पंचांनी दोन किंवा तीन रिप्ले तपासले आणि ठरवले की चेंडू संजू सॅमसनच्या ग्लोव्हजमध्ये आहे. चेंडू जमिनीला स्पर्श केलेला नव्हता. म्हणून, फखर झमानला बाद घोषित करण्यात आले. फखर झमानला त्याला बाद घोषित करण्यात आल्याचा विश्वासच बसत नव्हता. फखर झमान नाराज होऊन पॅव्हेलियनकडे परतला.
Who don't see finger behind the ball stop watching cricket .#INDvsPAK #PAKvIND pic.twitter.com/BCFojCI258
— Andy Pycroft 👽 (@Rahu_Ketu_12) September 21, 2025
नवीन अँगलही समोर- (New Angle Of Fakhar Zaman Catch)
हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) गोलंदाजीवर फखर झमानचा संजू सॅमसनने (Sanju Samson) झेल घेतला होता. मात्र हा झेल पूर्णपणे संजू सॅमसनने घेतला नव्हता. चेंडू जमीनीला लागून एक टप्पा झेल संजू सॅमसनने पकडल्याचा दावा पाकिस्तानच्या खेळाडूंकडून करण्यात येत आहे. याचदरम्यान संजू सॅमसनच्या झेलचा नवीन अँगल समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये संजू सॅमसनने योग्य झेल घेतल्याचं दिसून येतंय.





















