Umesh Yadav : उमेश यादव खास क्लबमध्ये सामील, घरच्या मैदानात 100 टेस्ट विकेट्स घेणारा तेरावा भारतीय, वाचा संपूर्ण लिस्ट
IND vs AUS : इंदूर टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अत्यंत महत्त्वाचे तीन विकेट्स घेतल्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादवनं एक खास रेकॉर्ड नावावर केला आहे.
Umesh Yadav, test record : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज उमेश यादवने (Umesh Yadav) आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याने मिचेल स्टार्कची विकेट घेताच त्याने घरच्या मैदानावर आपल्या 100 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारा तो तेरावा भारतीय गोलंदाज ठरला आहे. वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर अशी कामगिरी करणारा तो केवळ पाचवा भारतीय वेगवान गोलंदाज आहे.
ICYMI - 𝟭𝟬𝟬𝘁𝗵 𝗧𝗲𝘀𝘁 𝘄𝗶𝗰𝗸𝗲𝘁 in India for @y_umesh 💪
— BCCI (@BCCI) March 2, 2023
What a ball that was from Umesh Yadav as he cleans up Mitchell Starc to grab his 100th Test wicket at home. #INDvAUS pic.twitter.com/AD0NIUbkGB
भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs AUS) यांच्यात इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात, उमेश यादवने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पूर्णपणे फिरकी ट्रॅक असूनही शानदार गोलंदाजी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात फक्त 5 षटके टाकली ज्यात 12 धावा देत महत्त्वाचे 3 विकेट्स घेतले. त्याच्या दमदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावाच्या जोरावर फारशी आघाडी घेता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ येथे 197 धावांत ऑलआऊट झाला, तर भारतीय संघाचा पहिला डाव 109 धावांतच आटोपला होता. दरम्यान उमेश यादवपूर्वी 12 भारतीयांनी ही कामगिरी केली आहे.
मायदेशी 100 पेक्षा जास्त कसोटी बळी घेणारे भारतीय!
1. अनिल कुंबळे : 63 सामन्यात 350 बळी
2. आर अश्विन: 54 सामन्यात 329 विकेट
3. हरभजन सिंग: 55 सामन्यात 265 विकेट
4. कपिल देव: 65 सामन्यात 219 विकेट
5. रवींद्र जडेजा: 39 सामन्यात 193 विकेट
6. भागवत चंद्रशेखर: 32 सामन्यात 142 विकेट्स
7. बिशनसिंग बेदी: 30 सामन्यात 137 विकेट
8. जवागल श्रीनाथ: 32 सामन्यात 108 विकेट
9. झहीर खान: 38 सामन्यात 104 विकेट
10. इशांत शर्मा: 42 सामन्यांत 104 विकेट्स
11. विनू माकंड: 23 सामन्यात 103 विकेट्स
12. प्रज्ञान ओझा: 20 सामन्यात 101 विकेट
13. उमेश यादव: 31 सामन्यात 101 विकेट
फलंदाजीतही खास रेकॉर्ड केला नावावर
तिसर्या कसोटीत फलंदाजी करताना उमेश यादवने दोन शानदार षटकार ठोकले. आपल्या शानदार षटकारांच्या जोरावर त्याने युवराज सिंग आणि माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांना मागे टाकताना रन मशीन कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली. उमेशने दोन षटकार मारल्याने त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील 24 षटकार झाले. विराट कोहलीनेही कसोटीत भारतासाठी इतकेच षटकार ठोकले आहेत. दुसरीकडे उमेशने युवराज सिंग आणि रवी शास्त्री यांना मागे टाकले आहे, ज्यांच्या नावे अनुक्रमे 22-22 षटकार आहेत.
हे देखील वाचा-