Ind vs sa 4th T20 : 23 षटकार, 17 चौकार, 283 धावा... संजू सॅमसन-तिलक वर्माच्या शतकांनी रचला इतिहास... दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची सर्वात मोठी धावसंख्या
जोहान्सबर्ग टी-20 सामन्यात भारताने एक मोठा विक्रम केला आहे.
Tilak Varma Sanju Samson : भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 4 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोहान्सबर्ग टी-20 सामन्यात भारताने एक मोठा विक्रम केला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने 20 षटकांत 1 बाद 283 धावा केल्या. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेसमोर 284 धावांचे लक्ष्य आहे. भारताकडून संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी शतके झळकावली. या मालिकेत संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्यांदा शतकाचा टप्पा ओलांडला आहे.
Innings Break!
— BCCI (@BCCI) November 15, 2024
Absolutely dominating batting display from #TeamIndia at The Wanderers Stadium, Johannesburg⚡️ ⚡️
1⃣2⃣0⃣* from Tilak Varma
1⃣0⃣9⃣* from Sanju Samson
Scorecard ▶️ https://t.co/b22K7t8KwL#SAvIND pic.twitter.com/RO9mgJFZnL
संजू-तिलकच्या शतकांनी केला ऐतिहासिक विक्रम
सामन्यात भारतीय संघ सुरुवातीपासूनच आक्रमक दिसत होता. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा (36) यांनी सलामीला 73 धावांची भागीदारी केली. यानंतर संजूने तिलत वर्मासोबत विक्रमी 93 चेंडूत 210 धावांची नाबाद भागीदारी केली. संजू सॅमसनने 51 चेंडूत शतक तर टिळक वर्माने 41 चेंडूत शतक झळकावले.
Tilak Varma - 120* (47).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2024
Sanju Samson - 109* (56).
Abhishek - 36 (18).
INDIA HAMMERED 283/1 IN A T20I MATCH VS SOUTH AFRICA. 🚨 pic.twitter.com/D6JiH9BDds
संजू सॅमसनने 56 चेंडूत 109 धावांची शानदार खेळी केली. तर तिलकने 47 चेंडूत 120 धावा केल्या. संजूचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तिसरे शतक होते, जे त्याने गेल्या 5 सामन्यांमध्ये झळकावले आहे. दुसरीकडे, तिलक वर्माचे हे दुसरे शतक होते. या मालिकेतही त्याने सलग दोन्ही शतके झळकावली आहेत. तर आफ्रिकन संघाकडून लुथो सिपमला याने एकमेव विकेट घेतली.
SANJU SAMSON & TILAK VARMA - THE BROTHERS OF DESTRUCTION.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 15, 2024
- The partnership of 210* (86). 🥶🇮🇳 pic.twitter.com/cEJFQkZcUa
टी-20 इतिहासात प्रथमच आयसीसी पूर्ण राष्ट्र सदस्य संघांमध्ये एका संघातील दोन फलंदाजांनी एकत्र शतके झळकावली आहेत. हा इतिहास आहे. एकूणच या फॉरमॅटमध्ये हे तिसऱ्यांदा घडलं आहे. दुसरा विक्रम म्हणजे, या सामन्यात भारतीय संघाने 1 गडी बाद 283 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी 2 ऑक्टोबर 2022 रोजी 3 विकेट्सवर 237 धावा केल्या होत्या.
हे ही वाचा -
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी