(Source: Poll of Polls)
Team India ने झिम्बाब्वेला तिन्ही सामन्यात मात देत दिला व्हाईट वॉश, कशी होती संपूर्ण मालिका?
IND vs ZIM, ODI, Harare Sports Club: झिम्बाब्वेमध्ये पार पडलेल्या भारत विरुद्ध झिम्बाब्वे एकदिवसीय मालिकेत भारताने तीन पैकी तीन सामने जिंकत मालिका 3-0 ने जिंकत झिम्बाब्वेला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिला आहे.
IND vs ZIM Series : भारतीय संघाने (Team India) इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत मात दिल्यानंतर आपली विजयी घोडदौड कायम ठेवत झिम्बाब्वेला (India vs Zimbabwe) व्हाईट वॉश दिला आहे. सोमवारी तिसऱ्या आणि मालिकेतील अखेरच्या सामन्यात 13 धावांनी विजय मिळवत भारताने सामना आणि मालिकाही जिंकली. मालिकेतील पहिली सामना 10 विकेट्सनी दुसरा सामना 5 विकेट्सनी आणि तिसरा सामना 13 धावांनी जिंकत मालिका 3-0 ने जिंकली आहे.
CHAMPIONS 🇮🇳#TeamIndia pic.twitter.com/nVxqZ9A7v4
— BCCI (@BCCI) August 22, 2022
पहिल्या सामन्यात 10 विकेट्सने विजय
मालिकेतील पहिल्याच सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर 189 धावांवर झिम्बाब्वेला रोखत, भारताने हे लक्ष केवळ 30.5 षटकात पूर्ण करत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आधी दीपक, अक्षर आणि प्रसिध यांच्या भेदक गोलंदाजीनंतर सलामीवीर शुभमन आणि शिखर दोघांनी अप्रतिम अशी अर्धशतकं झळकावत भारताचा विजय पक्का केला.
दुसऱ्या सामन्यात 5 गडी राखून विजय
दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वेच्या संघानं निराशाजनक कामगिरी केली. या सामन्यात झिम्बाब्वेचा संघ 38.1 षटकांत 161 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात भारतानं 25.4 षटकात 5 विकेट्स गमावून 167 धावा करत सामना जिंकला.
भारताने अखेरच्या सामन्यासह मालिका जिंकली
तिसऱ्या सामन्यात भारताने सामन्यात आधी फलंदाजीवेळी शुभमन गिलचं (Shubhman Gill) दमदार असं शतक आणि गोलंदाजीत अखेरच्या षटकात शार्दूल, आवेश जोडीने केलेल्या भेदक माऱ्यामुळे भारत जिंकला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी घेतली. ज्यानंतर शुभमनच्या शतकाच्या जोरावर भारताने 290 धावांचे लक्ष्य झिम्बाब्वेला दिले. त्यानंतर झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज सिकंदर रझा (Sikandar Raza) याने अप्रतिम शतक ठोकत साऱ्यांचीच मनं जिंकली. शतक ठोकत त्याने संघाला अगदी विजयाजवळ आणलं पण काही धावा कमी पडल्याने झिम्बाब्वे पराभूत झाला आहे.
हे देखील वाचा-