VIDEO : वानखेडेवर विराट-रोहितचा भन्नाट डान्स, सूर्यकुमार यादवनेही धरला ठेका
Victory Parade : टी20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचे आज मुंबईत जल्लोषात स्वागत झालं. लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. कधी न थांबणारी मुंबई जगज्जेत्यांसमोर नतमस्तक झाली.

Team India Victory Parade : टी20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचे आज मुंबईत जल्लोषात स्वागत झालं. लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. कधी न थांबणारी मुंबई जगज्जेत्यांसमोर नतमस्तक झाली. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम दरम्यान ओपन डेक बसमधून विजयी मिरवणुकीत लाखोंच्या जनसमुदायाने आनंद साजरा केला. त्यानंतर वानखेडे मैदानावर आजच्या जल्लोष कार्यक्रमाचा समारोप झाला. वानखेडेवर दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंनी मैदानातच जबदरस्त डान्स करत उपस्थित फॅन्समध्ये ऊर्जा भरली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह टीम इंडिया खेळाडूंनी डान्स केला. ढोल ताशाच्या गजरात हे खेळाडू बेभान होऊन नाचले. मुंबईमध्ये त्यात मध्येच पावसाची संततधार कोसळत होती. पण चाहत्यांचा आणि विश्वविजेत्यांचा उत्साह मात्र कायम होता. रोहित, विराट अन् टीम इंडियाच्या खेळाडूंचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
पाहा व्हिडीओ -
Mentally, we'll remain here forever. ❤️pic.twitter.com/y6hopKrHQc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीत सर्वच खेळाडूंनी जल्लोष केला. त्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन दिग्गजांनी एकत्रितपणे वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आणि चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला.
The greatest duo of world cricket. 🥹❤️pic.twitter.com/XgtYOYwLkU
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
ओपन डक बसमधून खेळाडूंनी चाहत्यांचे अभिवादन स्विकारले. दरम्यान, कार्यक्रम आटोपल्यानंतर वानखेडे स्टेडियमवरील सर्व चाहत्यांचे चॅम्पियन टीम इंडियाने आभार व्यक्त केले. संपूर्ण स्टेडियमला फेरी मारत खेळाडूंनी सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त केले.
Thank you, Mumbai! ❤️
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
- An unforgettable day for team India and fans! 🌟 pic.twitter.com/JfxhK4YdjC
रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक
वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा गौरव करण्यात आला. यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "ही ट्रॉफी संपूर्ण देशाची आहे. सामना पाहणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार. गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे, मला माझ्या या संघाचा अभिमान आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे. यावेळी रोहित शर्माने हार्दिक पांड्याचे कौतुक केले. हार्दिक पांड्याने वर्ल्ड कप फायनलमध्ये शेवटची ओव्हर टाकली होती. रोहित शर्मा म्हणाला की, हार्दिक पांड्याने शानदार गोलंदाजी केली.
टीम इंडिया जल्लोष
17 वर्षानंतर टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यावर आज टीम इंडिया मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये दाखल झाली. चार तासांपासून टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये लाखो तरुण-तरुणाई एकवटले. लाखोंचा जनसागर मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पाहायला मिळाला. टीम इंडिया मरीन ड्राईव्ह वरून वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
