IND vs SL : श्रीलंका दौऱ्यात केएल राहुलसह श्रेयस अय्यरचं कमबॅक? वनडे मालिकेत रोहित शर्मा अन् विराट कोहलीचं काय?
IND vs SL : भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आता श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत.
नवी दिल्ली : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात भारतानं (Team India) टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करत विजेतेपद मिळवलं. यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वात टीम इंडियाची यंग ब्रिगेड झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर आहे. या दरम्यान भारतीय संघ श्रीलंकेच्या (Sri Lanka Tour) दौऱ्यावर जाणार आहे. भारत या दौऱ्यात तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, एकदिवसीय सामने खेळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. श्रीलंका दौऱ्याबाबत वरिष्ठ खेळाडूंनी अद्याप काही कळवलेलं नाही. दुसरीकडे केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे वनडे सामन्यांमध्ये कमबॅक करण्याची शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका 27 जुलैपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात भारत तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. भारताच्या श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर याचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ सुरु होणार आहे. रिपोर्टनुसार श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांचं कमबॅक होऊ शकतं. रोहित शर्मा आयसीसी चम्पियन्स ट्रॉफी पर्यंत भारतीय संघाचं नेतृत्व करणार असल्याचं बीसीसीआयनं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळं जर रोहित शर्मा श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध असल्यास तो कॅप्टन असू शकतो.
या 15 खेळाडूंना संधी मिळणार ?
कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल हे तिघे सलामीवीर असतील. मधल्या फळीत केएल. राहुल, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग यांना संधी मिळेल. विकेट कीपर म्हणून रिषभ पंत आणि केएल राहुलला संधी मिळू शकते. कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा यांना फिरकीपटू म्हणून तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान, अर्शदीप सिंग यांना संधी ममिळू शकते. बीसीसीआय रोहित शर्मा,जसप्रीत बुमराह आणि विराट कोहलीला आराम देऊ शकते.
श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (विकेटकीपर),रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आवेश खान आणि अर्शदीप सिंग
संबंधित बातम्या :