(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बांग्लादेशविरुद्ध सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, वन-डे सामन्यांसह कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर
Team India : टी-20 विश्वचषकानंतर भारतीय आधी संघ न्यूझीलंडला आणि त्यानंतर बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. बांग्लादेशविरुद्ध भारत तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.
Team India Squad For Bangladesh : ऑस्ट्रेलियामध्ये सुरु टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) 2022 स्पर्धेनंतर टीम इंडिया न्यूझीलंड आणि बांग्लादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. आधी 18 ते 30 नोव्हेंबर न्यूझीलंडविरुद्ध सामने खेळून भारत डिसेंबरमध्ये बांग्लादेशविरुद्ध सामने खेळेल. बांग्लादेशविरुद्ध भारत तीन एकदिवसीय सामने 4, 7 आणि 10 डिसेंबर रोजी खेळणार असून त्यानंतर दोन कसोटी सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयनं नुकताच संघ जाहीर केला आहे.
🚨NEWS: The All-India Senior Selection Committee has picked the squads for India’s upcoming series against New Zealand and Bangladesh.
— BCCI (@BCCI) October 31, 2022
यावेळी रोहित शर्मा कर्णधार तर केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय संघात शिखर धवनला संधी दिल्याने पुन्हा एकदा रोहित-शिखर जोडी मैदानात दिसणार आहे. याशिवाय एकदिवसीय संघात यश दयाल याला संधी दिली आहे. त्याने यंदाची आयपीएल 2022 चांगलीच गाजवली होती. दरम्यान भारताचा स्टार कसोटीपटू अजिंक्य रहाणे याला मात्र कसोटी संघात स्थान मिळालेलं नाही. तर नेमका संघ कसा आहे, पाहूया...
बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, यश दयाल
बांग्लादेशविरुद्ध कसोटी संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव.
भारत आणि बांग्लादेश एकदिवसीय सामन्याचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला एकदिवसीय सामना | 4 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
दुसरा एकदिवसीय सामना | 7 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
तिसरा एकदिवसीय सामना | 10 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
भारत आणि बांग्लादेश कसोटी मालिकेचं वेळापत्रक:
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 14 ते 18 डिसेंबर | झहूर अहमद चौधरी स्टेडियम |
दुसरा कसोटी सामना | 22 ते 26 डिसेंबर | शेर ए बांग्ला, ढाका |
हे देखील वाचा-