Rohit Sharma: टीम इंडियात फूट? रोहित शर्मा- गौतम गंभीर यांच्यात वाद? भारतात कसोटी मालिका गमावल्यानंतर संघात तीन गट पडल्याच्या चर्चा
Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांना वनडे क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही.
Rohit Sharma Gautam Gambhir Rift नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ असो किंवा इतर क्रिकेट देशांचे क्रिकेट संघ असो संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यात वाद होणं नवी गोष्ट नाही. भारतात यापूर्वी सौरव गांगुली-ग्रेग चॅपल, विराट कोहली- अनिल कुंबळे यांच्यात वाद झाल्याचं समोर आलं होतं. आता त्या यादीत रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्या नावांचा समावेश झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.गौतम गंभीर आणि रोहित शर्मामध्ये तणाव वाढल्याचा दावा करण्यात आला आहे.
न्यूज24 च्या वृत्तानुसार टीम इंडियाचा हेड कोच म्हणून गौतम गंभीर याला जे निर्णय घ्यायचे आहेत त्या निर्णयांवर रोहित शर्मा खुश नसल्याची माहिती आहे. रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यात देखील जोरदार वाद झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीम इंडियामध्ये गटबाजी वाढली आहे. संघातील काही खेळाडू रोहित शर्माच्या बाजूनं असल्याची माहिती सूत्रांच्या दाव्यानुसार सांगण्यात आली आहे.
वादाचं कारण काय?
न्यूज 24 च्या रिपोर्टनुसार गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर संघामध्ये रोहित शर्माचं काही चालत नाही. रोहित शर्मा त्याच्या धोरणानुसार संघ चालवाया प्रयत्न करतोय. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार गौतम गंभीर जे निर्णय घेईल ते सर्व खेळाडूंना मान्य करावे लागत आहेत. भारताला श्रीलंकेत झालेल्या वनडे मालिकेत पराभव स्वीकारावा लागला आहे. तर, न्यूझीलंड विरुद्ध भारतानं कसोटी मालिका गमावली आहे. न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.भारताला होम ग्राऊंडवर तब्बल 12 वर्षांनंतर कसोटी मालिका गमवावी लागली आहे.संघाच्या कामगिरीवरुन कॅप्टन आणि कोच आमने सामने आल्याच्या चर्चा आहेत
टीम इंडियातील वरिष्ठ खेळाडूंच्या फॉर्मवर आणि कामगिरीवर प्रशिक्षक गौतम गंभीर समाधानी नसल्याची माहिती आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली गौतम गंभीर कोच झाल्यापासून मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरत आहेत. भारतीय संघात तीन गट पडले असल्याची चर्चा आहे. काही खेळाडू रोहित शर्माच्या बाजूनं, काही खेळाडू गौतम गंभीरच्या बाजूनं तर काही खेळाडू आपल्या कामगिरीवर लक्ष देण्याच्या विचारात आहेत.
इतर बातम्या :