एक्स्प्लोर

IPL 2025: टीम इंडियाच्या स्टार गोलंदाजाला बाहेरचा रस्ता दाखवणार? पंजाब किंग्च्या निर्णयानं सगळेच हैराण, ऑक्शनमध्ये धमाका करणार

Punjab Kings Retention List: पंजाब किंग्जनं रिटेन्शन लिस्टमधून टीम इंडियाच्या स्टार वेगवान गोलंदाजाला वगळल्याच्या चर्चा आहेत. प्रीती झिंटा या स्टार खेळाडूला रिलीझ करु शकते.   

Punjab Kings not retain Arshdeep Singh नवी दिल्ली: आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरुच्या रिटेन्शन लिस्टची आयपीएलच्या चाहत्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे. या दरम्यान पंजाब किंग्जच्या रिटेन्शन लिस्टबाबत मोठी अपेट समोर आली आहे. एका मिडिया रिपोर्टनुसार पंजाब किंग्जकडून शशांक सिंह, प्रभासिमरन सिंह यांना रिटेन केलं जाऊ शकतं. मात्र, टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला रिटेन न करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर येतंय.   

क्रिकबझच्या  महितीनुसार पंजाब ऑक्शनमध्ये सर्वाधिक पैसे घेऊन उतरणार आहे. पंजाबच्या टीमकडून केवळ दोन खेळाडूंना रिटेन केलं जाणार आहे. शशांक सिंग आणि  प्रभासिमरन सिंग या दोघांना रिटेन केलं जाणार आहे. त्यामुळं पंजाबकडे ऑक्शनच्या काळात 112 कोटी रुपये असतील. रिपोर्टनुसार पंजाब किंग्जच्या मॅनेजमेंटकडून अर्शदीप सिंगला रिटेन करण्यासाठी 18 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दाखवण्यात आली नाही. पंजाब किंग्जचा कोच रिकी पाँटिंगला संघाचं कर्णधार पद स्टीव्ह स्मिथला द्यायचं आहे. 

अर्शदीप सिंग पंजाब किंग्जकडून 2019 पासून खेळतोय. 2021 पर्यंत त्याला 20 लाख रुपये मिळायचे. 2022 मध्ये अर्शदीप सिंगचा पगार 4 कोटी रुपयांपर्यंत वाढवला होता. जर, त्याला पंजाबनं रिटेन केलं असतं तर त्याला 18 कोटी रुपये मिळाले असते. 

भारतानं वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेला टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. भारताच्या या विजयात अर्शदीप सिंगचं मोठं योगदान होतं. 2024 च्या आयपीएलमध्ये 14 मॅचेस खेळल्या होत्या त्यामध्ये 19 विकेट अर्शदीप सिंगनं घेतल्या होत्या. पंजाब किंग्जनं अर्शदीप सिंगला रिटेन न करण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यानं 2024 च्या हंगामात 10 च्या इकोनॉमीनं धावा दिल्या होत्या.  

दरम्यान, 2024 च्या आयपीएलचं विजेते कोलकाता नाईट रायडर्सनं मिळवलं होतं.  आता 2025 च्या मेगा ऑक्शनसाठी सर्व फ्रंचायजी सज्ज झाल्या आहेत. सर्व संघांना कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार आहेत याची यादी आयपीएल व्यवस्थापनाकडे द्यावी लागणार आहे. विशेष बाब म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माला मुंबई इंडियन्सकडून रिटेन केलं जाणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रोहित शर्माकडे  2024 च्या आयपीएलमध्ये मुंबईच्या टीममध्ये कर्णधारपद नव्हतं.  रोहित शर्माच्याऐवजी मुंबई इंडियन्सनं  हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिलं होतं. मात्र, मुंबईची कामगिरी समाधानकारक झाली नव्हती. 

इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरतीDhananjay Deshmukh on Santosh Deshmukh|आरोपींना फाशी नाही जन्मठेप द्या, धनंजय देशमुखांची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 14 December 2024Eknath Shinde Varsha Banglow | वर्षा बंगला सोडून एकनाथ शिंदे आता मुक्तागिरी बंगल्यात राहायला जाणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
Aaditya Thackeray At Hanuman Mandir Dadar | दादरच्या हनुमान मंदिरात आदित्य ठाकरेंनी केली आरती
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
इंग्लंडचा ॲटकिन्सन : कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा दुसराच गोलंदाज!
Tim Southee : कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
कारकिर्दीतील शेवटची कसोटी खेळणाऱ्या गोलंदाज टीम साऊथीनं केला षटकारांचा भीम पराक्रम; थेट गेलची बरोबरी, कॅलिसला पछाडले!
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळं वाया? प्रेक्षकांना तिकिटाचे पैसे परत मिळणार का? जाणून घ्या
तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसानं गाजवला, प्रेक्षकांसाठी गुड न्यूज, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय
Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ
Aadhaar Card Update : आधार कार्ड मोफत अपडेटला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या नवी डेडलाईन
आधार कार्ड एक रुपया न देता अपडेट करा, पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या शेवटची तारीख 
India vs Australia 3rd Test : गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
गाबा कसोटीत पहिला दिवस पावसाने वाहून गेला, फक्त 80 चेंडूचा खेळ; पुढील चार दिवस काय होणार?
Aaditya Thackeray : भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
भाजपचं सरकार आल्यानंतर हिंदू मंदिरं धोक्यात, उद्धव ठाकरेंनी भाजपचं नकली हिंदुत्व केलं एक्स्पोज; आदित्य ठाकरे कडाडले
Embed widget