एक्स्प्लोर

MI Retention List IPL 2025 : 'वर्ल्डकप' विजेत्या कर्णधाराला.... मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माबाबत घेतला मोठा निर्णय! ‘या’ 5 खेळाडूंना ठेवले कायम?

आयपीएल 2025 ची तयारी सुरू झाली आहे आणि 31 ऑक्टोबरला सर्व संघ त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील.

Mumbai Indians Retained Players List IPL 2025 : आयपीएल 2025 ची तयारी सुरू झाली आहे आणि 31 ऑक्टोबरला सर्व संघ त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील. दरम्यान, मुंबई इंडियन्सकडून मोठी बातम्या समोर येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, व्यवस्थापनाकडून अनेक दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. यावेळी मुंबईचा संघ आपल्या रिटेन्शन लिस्टमध्ये अनेक मोठे बदल करू शकतो, असे बोलले जात आहे. दरम्यान अशी बातमी येत आहे की, भारतीय कर्णधार रोहित शर्माला 18 कोटी रुपयांमध्ये मुंबई इंडियन्स कायम ठेवण्याची शक्यता आहे. यासोबत कोणते खेळाडू कायम ठेवले असतील जाणून घेऊया...

1. रोहित शर्मा

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समध्ये खरेदी केले. रोहित शर्माची जागा घेतल्यानंतर हार्दिक प्रसिद्धीझोतात आला. या हंगामात रोहित आणि हार्दिक यांच्यातील मतभेदाच्या बातम्याही समोर आल्या होत्या. पण रोहित हा तोच खेळाडू आहे ज्याने त्याच्या नेतृत्वाखाली MI ला 5 वेळा IPL चॅम्पियन बनवले. तो मुंबईच्या सर्वात खास खेळाडूंपैकी एक आहे आणि आतापर्यंत त्याने या फ्रँचायझीसाठी 212 सामन्यांमध्ये 5,458 धावा केल्या आहेत. त्याला या हंगामात मुंबई इंडियन्स 18 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्याची शक्यता आहे. 

2. हार्दिक पांड्या

हार्दिक पांड्याने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला आयपीएल 2022 चा चॅम्पियन बनवले होते. गेल्या मोसमात तो मुंबईत परतला, पण अनेक चुकीच्या निर्णयांमुळे त्याच्यावर जोरदार टीका झाली. ना तो वैयक्तिकरित्या चांगली कामगिरी करू शकला ना त्याच्या कर्णधारपदात काही विशेष दिसले. पण हार्दिक हा अव्वल अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे, त्याचे मुंबईच्या व्यवस्थापनाशीही चांगले संबंध आहेत. एमआयमध्ये खेळण्याचा आणि आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा त्याचा अनुभव त्याला मुंबईसाठी ट्रम्प कार्ड बनवू शकतो.

3. सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव हा सध्याच्या क्रिकेटमधील काही मोजक्या फलंदाजांपैकी एक आहे ज्यांना टी-20चे यशस्वी फलंदाज म्हणता येईल. 360 डिग्री शॉट्स आणि गगनचुंबी षटकार मारण्याची त्याची क्षमता पाहता, कोणताही संघ त्याला आपल्यासोबत ठेवू इच्छितो. सूर्याची मागणीही वाढली आहे कारण तो आता भारतीय टी-20 संघाचा कर्णधार झाला आहे. त्याने आतापर्यंत एमआयसाठी 96 सामन्यांमध्ये 2,986 धावा केल्या आहेत.

4. जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीत सातत्य आणि अचूकता आहे, असे क्वचितच पाहायला मिळते. मुंबई इंडियन्समध्ये आल्यानंतर सुरुवातीचे काही हंगाम बुमराहसाठी चांगले नव्हते, परंतु MI ने त्याला जगातील अव्वल गोलंदाज बनवण्याचा पाया रचला आहे हे नाकारता येणार नाही. 18 कोटी रुपयांना लिलावात कायम ठेवण्यासाठी बुमराह पूर्ण हक्कदार आहे. गेल्या मोसमातही त्याने 13 सामन्यांत 20 बळी घेतले होते.

हे ही वाचा -

IPL 2025 Retention Players List : चेन्नई ते मुंबईपर्यंत, आयपीएलच्या 10 संघांनी 'या' खेळाडूंना ठेवले कायम? जाणून घ्या A टू Z अपडेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा , सुपरफास्ट  बातम्या |  ABP MajhaNitesh Rane vs Rais Shaikh : हिंदुत्वाचा मुद्दा का हाती घेतला? नितेश राणेंनी सांगितलं कारणMaulana Sajjad Nimani On Manoj Jarange| जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, कलाम मिळेलNitesh Rane vs Rais Shaikh : लव्ह जिहादचा मुद्दा, भर कार्यक्रमात नितेश राणे - रईस शेख भिडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Prakash Shendage : एकट्या मराठा समाजाच्या बळावर कुणालाही निवडणूक जिंकता येत नाही, जरांगेंना उशिरा सूचलेलं शहाणपण : प्रकाश शेंडगे
मनोज जरांगे एकट्याच्या बळावर कुणाला पाडू शकत नाहीत, प्रकाश शेंडगेंचा हल्लाबोल
Nepal 100 Rupees Note : नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
IPL 2025 Retention Players List : केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
Embed widget