Watch: 'भाभी को ही रुला दिया...',भारताविरुद्ध पराभव, पाकिस्तानच्या बॉलरची बायको ढसाढसा रडली, Video
IND vs PAK: भारतानं पाकिस्तानला टी-20 वर्ल्ड कपमध्ये 6 धावांनी पराभूत केलं. या पराभवामुळं पाकिस्तानी क्रिकेटरची बायको ढसाढसा रडली.
IND vs PAK नवी दिल्ली : टी20 वर्ल्ड कप 2024 (T20 World Cup 2024) मध्ये भारतानं रोमांचक सामन्यात पाकिस्तानला 6 धावांनी पराभूत केलं. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 19 ओव्हरमध्ये 119 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 10 ओव्हरपर्यंत पाकिस्तान मजबूत स्थितीत होता. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी विशेषत: जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलनं पाकिस्तानच्या हातून विजय हिसकावून घेतला. अखेरच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला 18 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगनं केवळ 12 धावा देत संघाला विजय मिळवून दिला. भारतानं पुन्हा एकदा टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं. पाकिस्तानचा क्रिकेटपटू उस्मान कादिर आणि त्याची पत्नी सोबिया खान हे टीव्हीवर ही मॅच पाहत होते. पाकिस्तानचा पराभव होताच सोबिया खान रडू लागली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील उरूज जावेद नावाच्या यूजरनं "बेशर्मांनी आपल्या भाभीला पण रडवलं" असं म्हणत एक व्हिडीओ पोस्ट केली. या व्हिडीओवर कमेंट केल्या जात आहेत. या व्हिडीओत उस्मान कादिर आणि त्याची पत्नी सोबिया खान आहेत. पाकिस्तानचा पराभव होताच सोबिया खान रडत असल्याचं पाहायला मिळतं.
उस्मान कादिरचं करिअर
उस्मन कादिर हा पाकिस्तानचा फिरकीपटू आहे. 2020 मध्ये पाकिस्तानसाठी त्यानं पहिली टी-20 मॅच खेळली होती. त्यानं पाकिस्तानकडून 25 टी-20 मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 31 विकेट घेतल्या असून त्याचा इकोनॉमी रेट 8 पेक्षा कमी आहे. पाकिस्तानकडून त्यानं एक वनडे मॅच देखील खेळली आहे.
Be sharmo ne apni bhabhi ko hi rula diya 😭#T20WorldCup2024 #INDvsPAK pic.twitter.com/XNAKtD0PLB
— Urooj Jawed🇵🇰 (@uroojjawed12) June 11, 2024
भारतानं पाकिस्तानला पुन्हा हरवलं
भारत आणि पाकिस्तान टी20 वर्ल्ड कपमध्ये नासाऊ काऊंटी स्टेडियमवर आमने सामने आले होते. भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 119 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्ताननं चांगली सुरुवात केली होती. 13 व्या ओव्हरपर्यंत पाकिस्ताननं 2 विकेटवर 73 धावा केल्या होत्या. मात्र, भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकललं आणि संघाला विजय मिळवून दिला. जसप्रीत बुमराहनं पाकिस्तानच्या तीन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्यानं दोन विकेट घेतल्या. अक्षर पटेल, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराजच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानला पराभूत केलं.
संबंधित बातम्या :
Kamran Akmal Apology: हरभजन सिंगनं खडसावलं, कामरान अकमल ताळ्यावर, जाहीर माफी मागत म्हणाला...