बांगलादेशच्या तमिम इक्बालने मागे घेतला निवृत्तीचा निर्णय; पंतप्रधान शेख हसीना यांच्या भेटीनंतर बदलला निर्णय
Tamim Iqbal Retirement: बांग्लादेशचा कर्णधार तमिम इक्बाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यामध्ये बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हस्तक्षेप केला आहे.

Tamim Iqbal Retirement: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर बांग्लादेशचा (Bangladesh) कर्णधार तमिम इक्बाल (Tamim Iqbal) याने हा निर्णय मागे घेतला आहे. वृत्तानुसार, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भेटीनंतर तमिमने हा निर्णय मागे घेतल्याचं म्हटलं जात आहे. तमिमने नुकतीच पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेतली होती. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
तमिमने त्याच्या कुटुंबियांसह पंतप्रधानांची भेट घेतली. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शेख हसीना यांनी तमिमला त्यांच्या घरी आमंत्रित केले होते. त्यानंतर त्यांनी तमिमला पुन्हा खेळण्याचा आग्रहदेखील केला. त्यानंतर तमिमने त्याच्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.
तमिमने पत्रकार परिषद घेत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली होती. तसेच पत्रकार परिषदे दरम्यान तमिम भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. आफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर तमिम इक्बाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तमिमने बांगलादेशसाठी 2007 मध्ये क्रिकेटच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये बांगलादेशचे नेतृत्व केलं आहे.
अफगाणिस्तान आणि बांग्लादेश यांच्यामध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये तमिम इक्बाल बांग्लादेश संघाचे नेतृत्व करत होता. तीन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना 5 जुलै रोजी बुधवारी झाला. यामध्ये बांग्लादेशाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यामध्ये आफगाणिस्तानने 17 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यानंतर तमिम इक्बाल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तडकाफडकी निवृत्ती घेत तमिम इक्बाल याने बांगलादेशच्या चाहत्यांना धक्का दिला होता. मात्र आता त्याच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना देखील सुखद धक्का मिळाल्याचं म्हटलं जात आहे.
Tamim overturned his retirement decision after the meeting with the Prime Minister!
— মুহা. তাজুল ইসলাম (@tazul88official) July 7, 2023
তামিমের ফিরে আসা! ,অবসর প্রত্যাহার!#তামিম #TamimIqbal #tamim pic.twitter.com/ODtn5o59Se
कशी आहे तमिमची क्रिकेटची कारकिर्द ?
तमिम इक्बाल याने 37 एकदिवसीय सामन्यात बांग्लादेशचं नेतृत्व केलं आहे. त्यामधील 21 सामन्यांमध्ये बांगलादेशला यश मिळालं आहे. तर 14 सामन्यांमध्ये बांग्लादेशच्या पदरी निराशा पडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात तमिमने 70 कसोटी, 241 वनडे आणि 78 टी20 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केलं आहे.
तमिमने 70 कसोटी सामन्यांमध्ये 5134 धावा केल्या आहेत. तसेच त्याने वनडेमध्ये 37 च्या सरासरीने 8313 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा तमिमच्या नावावर आहे. त्याने टी20 सामन्यांमध्येही दमदार कामगिरी केली आहे. त्याने टी20 मध्ये 24 च्या सरासरीने 1758 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
