T20 World Cup 2024 : हार्दिक पांड्या उपकर्णधार, शिवम दुबेला संधी, राहुलला झटका, विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड
India T20 World Cup Squad: टी20 विश्वचषकासाठी टीम इंडिायच्या 15 शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे.
India T20 World Cup Squad: टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची (World Cup Squad) घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारतीय संघ (Team India) विश्वचषकात उतरणार आहे. हार्दिक पांड्याकडे (Hardik pandya) उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंत आणि संजू सॅमसन भारतीय संघाचे विकेटकीपर असतील. केएल राहुल याचा पत्ता कट झालाय. वेगवान गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह, सिराज आणि अर्शदीप सिंह यांना स्थान मिळाले आहे. शिवम दुबे पहिल्यांदाच विश्वचषकात खेळणार आहे. शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद यांना राखीव खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.
एक जूनपासून टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयनं आज टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा केली. रोहित शर्माकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माशिवाय यशस्वी जायस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना टॉप ऑर्डरचे फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना विकेटकीपर म्हणून निवडण्यात आले आहे.
🚨India’s squad for ICC Men’s T20 World Cup 2024 announced 🚨
— BCCI (@BCCI) April 30, 2024
Let's get ready to cheer for #TeamIndia #T20WorldCup pic.twitter.com/jIxsYeJkYW
ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांनी आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये टॉप 5 फलंदाजांमध्ये आहेत. त्याशिवाय दुबे यालाही संधी देण्यात आली आहे. गोलंदाजीत युजवेंद्र चहल आणि कुलदीप यांना संधी दिली आहे.
फलंदाज - 4
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव,
अष्टपैलू - 4
हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शिवम दुबे,
विकेटकीपर - 2
ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर),
फिरकीपटू -2
कुलदीप यादव, युजवेंद्र चहल ,
वेगवान गोलंदाज - ३
अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू -
शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान
टी20 वर्ल्ड कप मध्ये भारताचे सामने कधी?
टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत अ गटात आहे. भारताची पहिली मॅच आयरलँड विरुद्ध होणार असून दुसरी मॅच पाकिस्तान विरुद्ध होईल. वर्ल्ड कपमधील हाय व्होल्टेज लढत भारत आणि पाकिस्तान 9 जूनला आमने सामने येणार आहेत.भारताची तिसरी मॅच यूएस आणि चौथी मॅच 15 जूनला कॅनडाविरुद्ध होणार आहे.
ICC Men’s T20 World Cup 2024 – India’s Fixtures (Group A matches) |
|||
Date |
Day |
Match |
Venue |
05-June-24 |
Wednesday |
India vs Ireland |
Nassau County International Cricket Stadium, New York |
09-June-24 |
Sunday |
India vs Pakistan |
Nassau County International Cricket Stadium, New York |
12-June-24 |
Wednesday |
USA vs India |
Nassau County International Cricket Stadium, New York |
15-June-24 |
Saturday |
India vs Canada |
Central Broward Park & Broward County Stadium, Lauderhill |
भारताला दुसऱ्या विजेतेपदाची आशा
भारतीय टीमनं पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. तो वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेत झाला होता. पहिल्या वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीच्या लढतीत भारतानं पाकिस्तानला पराभूत करत विजय मिळवला होता. भारताला पहिल्या विजेतेपदानंतर दुसऱ्यांदा विजेतेपद मिळालेलं नाही. टी20 वर्ल्ड कप मध्ये भारतानं आतापर्यंत 44 मॅच खेळल्या आहेत. भारताला 15 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. तर, 27 मॅचमध्ये भारताला विजय मिळाला आहे. तर, एक मॅच टाय झाली तर एक मॅच रद्द झाली.