(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'गेले 10 दिवस माझ्यासाठी खूप कठीण, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत...'; इरफान पठाण ढसाढसा रडला, काय म्हणाला?
T20 World Cup 2024 Team India: भारतीय संघाच्या या विजयानंतर सर्वजण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मैदानात खेळाडूंना देखील आनंदाश्रू अनावर झाले.
T20 World Cup 2024 Team India: भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2024) 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-20 2024 विश्वचषकाचा चॅम्पियन ठरला. 2013 नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. (India Win T20 World Cup 2024)
भारतीय संघाच्या या विजयानंतर सर्वजण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. मैदानात खेळाडूंना देखील आनंदाश्रू अनावर झाले. याचदरम्यान टी-20 विश्वचषकाची समालोचनाची भूमिका करणारा आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इरफान पठाण भारतीय संघाचे कौतुक करत रडल्याचे दिसून येत आहे.
इरफान पठाण नेमकं काय म्हणाला?
मी जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांचे आभार मानतो. सूर्यकुमार यादवचा झेल तर मी माझ्या आयुष्यामध्ये विसरणार नाही. माझा शेवटचा श्वासापर्यंत मी सूर्यकुमार यादवचा झेल आठवणीत ठेवेल. दक्षिण अफ्रिकेचा डेव्हिड मिलर इतका घातक फलंदाज आहे की त्याचा तो षटकार गेला असता, तर भारताने सामना गमावला असता. तसेच भारतीय संघाला माहिती नाही, पण तुम्हाला कल्पना आहे. गेले 10 दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. आज माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आलंय, असं सांगताना इरफान पठाण ढसाढसा रडला.
Irfan Pathan become emotional 😭😭
— wafii 🇮🇳 (@mdwafi15) June 29, 2024
Special thanks to surya Kumar yadav🥹😭😭😭😭 #T20WorldCup2024 #suryakumaryadav #RohitSharma𓃵 #ViratKohli #RohitSharma #Dhoni #CongratulationsteamIndia #RishabhPant #JaspritBumrah #India#Thala #Southafrica #HardikPandya pic.twitter.com/LUtsfLm8uv
इरफान पठाणच्या मेकअप आर्टिस्टचा मृत्यू
भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण टी-20 विश्वचषकात समालोचनाची भूमिका बजावत होता. यादरम्यान इरफान पठाणचा मेकअप आर्टिस्ट फैयाज अन्सारीचा स्विमिंगपूलमध्ये पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फैयाज अन्सारीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनूसार तो इरफान पठाणसोबत वेस्ट इंडिजला गेला होता. यादरम्यान वेस्ट इंडिजमधील एका हॉटेलच्या स्विमिंगपूलमध्ये पोहताना फैयाजचा मृत्यू झाला.
कोण आहे फैयाज अन्सारी?
मृत फैयाज अन्सारी हा मूळचा बिजनौरच्या नगीना तहसीलमधील मोहल्ला काझी सराय येथील रहिवासी होता. अनेक वर्षे तो मुंबईत मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होता. तिथे त्याचे सलूनचे दुकान होते. दरम्यान, एक दिवस भारतीय क्रिकेटर इरफान पठाण त्याच्या सलूनमध्ये आला होता. त्यानंतर दोघांची ओळख झाली आणि इरफानने फैयाजला आपला मेकअप आर्टिस्ट बनवले. इरफाननेही तिला परदेशात सोबत नेण्यास सुरुवात केली.