एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 Team India Prize Money: विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडिया मालामाल; द. अफ्रिकेलाही कोट्यवधी रुपये, कोणाला किती मिळाले?

T20 World Cup 2024 Team India Prize Money: टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम 11.25 दशलक्ष डॉलर्स (93.51 कोटी) ठेवण्यात आले  होते.

T20 World Cup 2024 Team India Prize Money: भारतीय संघाने टी-20 विश्वचषक स्पर्धेतील (T20 World Cup 2024) 17 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसह भारत टी-20 2024 विश्वचषकाचा चॅम्पियन ठरला. 2013 नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. (India Win T20 World Cup 2024)

रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण अफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बाद 169 धावांवर रोखले. निर्णयाक क्षणी अर्धशतक झळकवणार विराट कोहली सामनावीर ठरला, तर जसप्रीत बुमराहला मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. जेतेपद पटकवल्यानंतर भारतीय संघाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले. भारतीय संघासोबतच दक्षिण आफ्रिकेलाही बक्षीस मिळाले आहे. टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी एकूण बक्षीस रक्कम 11.25 दशलक्ष डॉलर्स (93.51 कोटी) ठेवण्यात आले  होते. जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला 20.36 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली. तर दक्षिण आफ्रिकेने  1.28 मिलियन डॉलर्स म्हणजेच 10.64 कोटी कमावले. 

उपांत्य फेरीत पोहोचलेल्या संघांनाही मोठं बक्षीस

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सोबतच आणखी दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचले होते. इंग्लंड आणि अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली होती. मात्र, या दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड आणि अफगाणिस्तानला बक्षीस म्हणून 6.54 कोटी रुपये मिळाले आहेत. याशिवाय इतर संघांनाही बक्षीस मिळाले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पोहोचलेल्या प्रत्येक संघाला म्हणजेच सुपर 8 ला 3.17 कोटी रुपये मिळाले आहेत.

शेवटच्या स्थानावर असलेल्या संघही मालामाल-

टी-20 विश्वचषक 2024 मध्ये शेवटच्या स्थानावर असलेल्या संघालाही बक्षीस रक्कम मिळाली आहे. यामध्ये 9व्या ते 12व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 2.05 कोटी रुपये मिळाले आहेत. तर 13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या संघांना 1.87 कोटी रुपये मिळाले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील विजयासाठी 25.89 लाख रुपये मिळाले आहेत. सुपर 8 च्या ग्रुप 1 च्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर टीम इंडिया येथे अव्वल स्थानावर होती. तर अफगाणिस्तान संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तर गट 2 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानावर होता. तर इंग्लंड संघ दुसऱ्या क्रमांकावर होता.

संबंधित बातम्या:

विश्वषचक हातात धरताच जंटलमन राहुल द्रविडचा शांत आवेश झटक्यात बदलला; सेलिब्रेशन पाहून सगळेचं पाहत राहिले

T20 World Cup 2024 Team India Celebration: विश्वचषक घेताना रोहित शर्माची अनोखी एन्ट्री; सोशल मीडियावर ट्रेंड, पाहा संपूर्ण Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलंRaj Thackeray Full Speech Ghatkopar : अपयशी ठरलो तर दुकान बंद करेन! राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन...ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget