एक्स्प्लोर
T20 World Cup 2024: जिंकला, हसला, रडला, तिरंगा रोवला; विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे अंगावर काटा आणणारे टॉप 15 फोटो
T20 World Cup 2024: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील शेवटचा चेंडू पडताच रोहित शर्मा मैदानावर झोपला आणि जोरजोरात हात आपटून रडू लागला.
team india celebration world cup 2024
1/15

टी-20 विश्वचषकात रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेला 7 धावांनी नमवले आणि दुसऱ्यांदा टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरले.
2/15

प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण अफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बाद 169 धावांवर रोखले.
3/15

निर्णयाक क्षणी अर्धशतक झळकवणार विराट कोहली सामनावीर ठरला, तर जसप्रीत बुमराहला मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.
4/15

उपकर्णधार हार्दिक पांड्या देखील भावूक झाला होता. यावेळी रोहित शर्माने हार्दिक पांड्याने उचलून घेतले.
5/15

विजयानंतर प्रत्येक खेळाडू आनंदात न्हाहून निघाला होता. यावेळी रोहित शर्मा वेगळ्याच मूडमध्ये दिसला. यावेळी जेतेपदाची ट्रॉफी घेण्यासाठी जाताना रोहित शर्माने केलेल्या कृतीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
6/15

मेस्सीची फुटबॉल कारकीर्दही अशीच काहीशी होती. वर्ल्डकपचं स्वप्न उराशी बाळगून अनेक वर्षे काढली. अखेर शेवटच्या टप्प्यात जेतेपदावर नाव कोरलं. असंच काही रोहित शर्माचं झालं आहे. टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्यापूर्वी जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
7/15

सामन्यातील शेवटचा चेंडू पडताच रोहित शर्मा मैदानावर झोपला आणि जोरजोरात हात आपटून रडू लागला.
8/15

विश्वचषक पटकावल्यानंतर रोहित शर्मा भारताचा तिरंगा मैदानात रोवला.
9/15

हार्दिक पांड्याची मुलाखत सुरु असताना रोहित शर्मा ऑन कॅमेरा आला आणि त्याला पप्पी देऊन गेला.
10/15

सामना जिंकल्यानंतर रोहित मैदानात झोपला. यावेळी जसप्रीत बुमराह देखील त्याच्या बाजूला बसला होता.
11/15

रोहित शर्मासह त्याची पत्नी रितिका देखील खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
12/15

रोहित शर्मा, विराट कोहलीसह सर्व खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना उचलून धरलं.
13/15

रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. भारतानं 2007 नंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला. यानंतर दोन्ही दिग्गजांनी हिच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
14/15

विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित आणि कोहलीने तिरंगासह फोटो काढला.
15/15

राहुल द्रविड नेहमी शांत आणि संयमी म्हणून ओळखले जातात. यावेळी आयसीसी टी-20 विश्वचषकाची ट्रॉफी हातात येताच राहुल द्रविड खूप आनंदी झाले. तसेच त्यांनी भन्नाट सेलीब्रेशन देखील केले. राहुल द्रविड यांचे हे रुप कधीच पाहिले नसेल.
Published at : 30 Jun 2024 12:22 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























