T20 World Cup 2024 SA vs AFG: द. अफ्रिकेची टी20 विश्वचषकात पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक; अफगाणिस्तानविरुद्ध एकतर्फी विजय
T20 World Cup 2024 SA vs AFG: या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले.
T20 World Cup 2024 SA vs AFG: टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) च्या स्पर्धेत आज झालेल्या अफगाणिस्तान आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना झाला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने 9 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. दक्षिण आफ्रिकेने प्रथमच टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तानचा संघ 11.5 षटकांत केवळ 56 धावांवर सर्वबाद झाला. या काळात मार्को यानसेन आणि तबरेझ शम्सी यांनी संघाकडून सर्वाधिक प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेने 8.5 षटकांत 1 गडी गमावत 60 धावा करून विजय मिळवला.
A dominant display with the ball puts South Africa through to the Men's #T20WorldCup Final for the very first time 👌
— ICC (@ICC) June 27, 2024
📝 #SAvAFG: https://t.co/iy7sMxLlqY pic.twitter.com/Ep8VzuVMiE
अफगाणिस्तानचा डाव कसा राहिला?
उपांत्य फेरीत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध अफगाणिस्तानकडून सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज शून्य धावावर बाद झाला. तर इब्राहिम झदरनने 5 चेंडूत 2 धावा केल्या. गुलबदिन नईबने 9, अजमतुल्ला उमरझाई 10, मोहम्मद नबी 0, नांगेलिया खरोटे 2, करीम जनात 8, राशिद खान 8, नूर अहमद 0, नवीन उल-हक 2 आणि फजलहक फारुकीने 2 धावा केल्या.
अफगाणिस्तानने शानदार खेळ करत गाठली उपांत्य फेरी
अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. मात्र उपांत्य फेरीत संघाला ती कामगिरी कायम ठेवता आली नाही. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानने ग्रुप स्टेजमधील चारपैकी तीन सामने जिंकले होते. संघाने युगांडा, न्यूझीलंड आणि पापुआ न्यू गिनीविरुद्ध तीन सामने जिंकले. संघाला शेवटचा पराभव वेस्ट इंडिजविरुद्धच्या गटात झाला. यानंतर अफगाणिस्तानने सुपर-8मध्ये भारताविरुद्ध पराभवाची सुरुवात केली. मात्र, त्यानंतर संघाने पुढील दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली होती.
THANK YOU, AFGHANISTAN CRICKET 🌟
— Johns. (@CricCrazyJohns) June 27, 2024
- This dream run in T20I World Cup 2024 will be remembered forever by all cricket fans. pic.twitter.com/dm51oSsqtK
संबंधित बातम्या: