(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2024 IND vs AFG: रोहित, कोहली, पंत, शिवम गडगडले, 'सूर्या' चमकला; अफगाणिस्तानला विजयासाठी 182 धावांचे आव्हान
T20 World Cup 2024 IND vs AFG: भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा 8, विराट कोहली 24 आणि ऋषभ पंत 20 धावा करत बाद झाला.
T20 World Cup 2024 IND vs AFG: टी20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024)च्या स्पर्धेत आज भारत आणि अफगाणिस्तान (Ind vs Afg) यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 8 विकेट्स गमावत 181 धावा केल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला विजयासाठी 182 आव्हान असणार आहे.
भारताची सुरुवात चांगली झाली नाही. रोहित शर्मा 8, विराट कोहली 24 आणि ऋषभ पंत 20 धावा करत बाद झाला. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानसमोर भारताचे सलामीवीर गडगडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याने चांगली भागिदारी करत भारताचा डाव सावरला. सूर्यकुमारने 28 चेंडूत 53 धावा केल्या. तर हार्दिक पांड्या 24 चेंडूत 32 धावा करत बाद झाला. तर अफगाणिस्तानकडून राशिद खानने 3, फजलहक फारुकी 3 आणि नवीन उल हकने 1 विकेट घेतली.
A 27 BALL FIFTY BY SURYAKUMAR YADAV.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 20, 2024
- What a fifty by Sky, team India needed the most and Surya delivers. 🇮🇳 pic.twitter.com/wobkRQXYAV
शेवटच्या 5 षटकांत 55 धावा
सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी आपल्या विकेट्स वारंवार अंतराने गमावल्या असल्या तरी त्याचा भारताच्या धावगतीवर परिणाम झाला नाही. टीम इंडियाने शेवटच्या 5 षटकांत एकूण 55 धावा केल्या. शेवटच्या 5 पैकी तीन षटकांत 10 पेक्षा जास्त धावा झाल्या. अफगाणिस्ताननेही शेवटच्या 5 षटकांमध्ये पुनरागमन केले, कारण या षटकांमध्ये सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांच्या विकेट पडल्या नसत्या तर भारताला 200 धावांपर्यंत मजल मारता आली असती.
भारताची Playing XI:
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
अफगाणिस्तानची Playing XI:
रहमानउल्ला गुरबाज(विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्लाह झद्रान, हजरतुल्ला झाझाई, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी