T20 World Cup 2024 IND vs AFG: भारताचा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय; मोहम्मद सिराजच्या जागी हुकूमी एक्का परतला, पाहा Playing XI
T20 World Cup 2024 IND vs AFG: आयसीसी टी-20 क्रमवारीवर नजर टाकली तर भारत पहिल्या क्रमांकावर आहे, तर अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे.
T20 World Cup 2024 IND vs AFG: टी20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024)च्या स्पर्धेत आज भारत आणि अफगाणिस्तान (Ind vs Afg) यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचा संघ एक बदलसह मैदानात उतरला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या जागी रोहित शर्माने फिरकीपटू कुलदीप यादवला संधी दिली आहे. कुलदीप यादव यंदाच्या टी २० विश्वचषकातील पहिलाच सामना आज खेळणार आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीवर नजर टाकली तर भारत पहिल्या क्रमांकावर आहे, तर अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे.
WT20 2024. India won the toss and elected to Bat. https://t.co/gzppPXeAev #T20WorldCup #AFGvIND
— BCCI (@BCCI) June 20, 2024
भारताची Playing XI:
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.
अफगाणिस्तानची Playing XI:
रहमानउल्ला गुरबाज(विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्लाह झद्रान, हजरतुल्ला झाझाई, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी
भारताचा संपूर्ण संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यशस्वी जैस्वाल, कुलदीप यादव, संजू सॅमसन , युझवेंद्र चहल
अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ:
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झदरन, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, मोहम्मद इशाक, नांगेलिया खरोटे, हजरतुल्ला झाझाई