एक्स्प्लोर

T20 World Cup 2024: मोठी बातमी, नेदरलँडच्या बॉलरचा भेदक बाऊन्सर, बॉल थेट हेल्मेटमध्ये अडकला, बांगलादेशचा खेळाडू थोडक्यात बचावला

T20 World Cup 2024 BAN vs NED : टी 20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश विरुद्ध नेदरलँड यांच्यात मॅच सुरु आहे. या मॅचमध्ये बांगलादेशचा तंजिद हसन थोडक्यात बचावला. 

T20 World Cup 2024 किंग्जटाऊन : टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) बांगलादेश विरुद्ध नेदरलँड (BAN vs NED) यांच्यात मॅच सुरु आहे. बांगलादेशनं नेदरलँड पुढं विजयासाठी 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशचा सलामीवीर तंजिद हसननं चांगली कामगिरी करत 35 धावा केल्या. मात्र, तंजिद हसन मोठ्या संकटातून वाचला. किंग्जटाऊनच्या अर्नोस वेल ग्राऊंडवर सुरु असलेल्या मॅचमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. नेदरलँडचा गोलंदाज विवियन किंगमा याचा बाऊन्सर तंजिद हसनच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. विशेष म्हणजे बॉल थेट हेल्मेट आणि त्याच्या ग्रिलमध्ये अडकल्यानं हसन थोडक्यात बचावला. हसननं हेल्मेट काढल्यानंतर देखील बॉल तसाच अडकेला होता. 

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram
 
A post shared by ICC (@icc)

हा सर्व प्रकार बांगलादेशच्या डावाच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये घडला. विवियन किंगमा याच्या बाऊन्सरवर तंजिद हसननं पूल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरला आणि बॉल थेट त्याच्याकडे आला. बॉलला अधिक वेग असल्यानं  हसन चूकला.किंगमानं टाकलेला बॉल थेट हसनच्या  हेल्मेटमध्ये घुसला. हसननं तातडीनं हेलमेट काढून टाकलं. मात्र, बॉल लगेचेच निघाला नाही.

हेल्मेट मध्ये बॉल अडकल्यानंतर वैद्यकीय पथक मैदानात दाखल झालं. त्यांनी तंजिद हसनची तपासणी केली. तंजिद हसनला दुखापत झाली नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यानं खेळण्यास पुन्हा सुरुवात केली. 

नेदरलँडचा कॅप्टन स्कॉट एडवर्डनं बांगलादेश विरुद्ध टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गट ड मधून दक्षिण आफ्रिकेनं सुपर 8 साठी क्वालिफाय केलं आहे. आता दुसऱ्या स्थानासाठी बांगलादेश आणि नेदरलँडमध्ये शर्यत आहे. श्रीलंकेचा संघ सुपर 8 च्या शर्यतीतून बाहेर गेलेला आहे. 

बांगलादेशनं 20 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 159 धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून सर्वाधिक 64 धावा शाकिब उल हसन यानं केल्या. तंजिद  हसननं 35 धावा केल्या. नेदरलँडकडून पॉल वॅन मीकरन आणि आर्यन दत्त यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. नेपाळचा संघ देखील या गटात आहे. मात्र, त्यांचा एक सामना पावसामुळं रद्द करण्यात आला.

संबंधित बातम्या :

 भारतानं वाचवूनही पाकिस्तान डेंजर झोनमध्ये, अमेरिका आयरलँड विरुद्ध एक बॉल न खेळता सुपर 8 मध्ये जाण्याची शक्यता कारण...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget