T20 World Cup 2024 AUS vs NAM: टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने रंग दाखवला, 5.4 षटकातच सामना जिंकला; ट्रेव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नरची तुफानी खेळी
T20 World Cup 2024 AUS vs NAM: ॲडम झम्पा आणि ट्रॅव्हिस हेड या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाला हा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
T20 World Cup 2024 AUS vs NAM: टी-20 विश्वचषक 2024 च्या (T20 World Cup 2024) 24 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नामिबियाचा (Australia vs Namibia) पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीमध्ये अदभुत कामगिरी केली आणि नंतर फलंदाजीत दमदार शैली दाखवत नामिबियाविरुद्धचा सामना 9 विकेट्सने जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या नामिबियाला कांगारूंच्या गोलंदाजांनी 17 षटकांत 72 धावांत सर्वबाद केले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 5.4 षटकात सामना जिंकला. तसेच या विजयासह ऑस्ट्रेलिया विश्वचषकातील सुपर-8 च्या फेरीसाठी पात्र ठरला आहे.
Travis Head - 34*(17)
— Johns. (@CricCrazyJohns) June 12, 2024
David Warner - 20(8)
Mitchell Marsh - 18*(9)
AUSTRALIA CHASE DOWN 73 RUNS FROM JUST 5.4 OVERS. 💥 pic.twitter.com/h3sCBt5phh
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात जास्त चेंडू शिल्लक असताना हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. ॲडम झम्पा आणि ट्रॅव्हिस हेड या फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियाला हा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. झम्पाने गोलंदाजी करताना 4 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याने 4 षटकात केवळ 12 धावा दिल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियासाठी ट्रॅव्हिस हेडने सर्वात मोठी खेळी खेळली आणि 17 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 34 धावा केल्या. या काळात त्याचा स्ट्राइक रेट 200 होता. अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी विजय मिळवला.
Australia are through to the Second Round of #T20WorldCup 2024 after comprehensive win over Namibia 💪
— T20 World Cup (@T20WorldCup) June 12, 2024
📝 #AUSvNAM: https://t.co/07OgABBmlt pic.twitter.com/8o6ZB7Wos8
73 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडच्या साथीने सलामी देत चांगली सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 21 (10 चेंडू) धावांची भागीदारी केली. दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरच्या विकेटने ही भागीदारी संपुष्टात आली. वॉर्नरने 8 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 20 धावा केल्या. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मिचेल मार्श यांनी तिसऱ्या विकेटसाठी 53 (24 चेंडू) धावांची अखंड भागीदारी केली आणि संघाला विजयाची रेषा ओलांडण्यास मदत केली. यादरम्यान, ट्रॅव्हिस हेडने 17 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. याशिवाय कर्णधार मिचेल मार्शने 9 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 18 धावा केल्या.
नामिबिया 72 धावांत गडगडला-
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या नामिबियाला 14 धावांच्या स्कोअरवर तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर निकोलस डेव्हिनच्या (02) रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जॉन फ्रायलिंकच्या (01) रूपाने नामिबियाने दुसरी विकेट गमावली. यानंतर संघाची तिसरी विकेट ५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मायकेल व्हॅन लिंगेनच्या रूपाने पडली, ज्याने 10 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 10 धावा केल्या. त्यानंतर संघाचा स्टार फलंदाज डेव्हिड व्हीजे (01) सहाव्या विकेटच्या रूपात 11व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पुढे जात असताना रुबेन ट्रम्पलमनच्या 13व्या षटकातील चौथ्या चेंडूवर संघाची सातवी विकेट पडली. ट्रम्पलमॅनने 7 चेंडूत 1 षटकाराच्या मदतीने 7 धावा केल्या. त्यानंतर नामिबियाला 8वा धक्का बर्नार्ड शॉल्ट्झच्या रूपाने बसला, त्याला झंपाने खाते न उघडता बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. यानंतर संघाने चांगली खेळी खेळणारा कर्णधार गेरहार्ड इरास्मसची नववी विकेट गमावली. कर्णधाराने 43 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 36 धावा केल्या आणि त्यानंतर संघाने शेवटची विकेट गमावली, म्हणजेच 17 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बेन शिकोंगोच्या रूपात 10वी विकेट गमावली.