T20 World Cup 2024 AFG vs BAN: हाच तो विजयाचा क्षण, जिथे शिकार झाली बंगाली वाघांची, घायाळ झाले कांगारु, Video
T20 World Cup 2024 AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या या विजयानंतर सर्व खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
![T20 World Cup 2024 AFG vs BAN: हाच तो विजयाचा क्षण, जिथे शिकार झाली बंगाली वाघांची, घायाळ झाले कांगारु, Video T20 World Cup 2024 Afghanistan vs Bangladesh The Winning Moment For Afganistan lets see the full video T20 World Cup 2024 AFG vs BAN: हाच तो विजयाचा क्षण, जिथे शिकार झाली बंगाली वाघांची, घायाळ झाले कांगारु, Video](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/5f9be43f0dba958d0f7679d9a09d86f21719295758772987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
T20 World Cup 2024 AFG vs BAN: आज टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत (T20 World Cup 2024) अफगाणिस्तानने बांगलादेशचा (Afghanistan vs Bangladesh) पराभव करत इतिहास रचला आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. अफगाणिस्तानच्या या विजयानंतर सर्व खेळाडू भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार राशिद खानलाही अश्रू अनावर झाले. तसेच मैदानात मोठ्या प्रमाणात जल्लोषही करण्यात आला.
विजयाचा हाच तो क्षण-
THE WINNING MOMENT FOR AFGANISTAN. 🇦🇫
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 25, 2024
- Pure raw emotions, the boys made it to the Semi Final. 🥹❤️pic.twitter.com/IMW34vfjbj
बांगलादेशकडून लिटन दासची शेवटपर्यंत झुंज-
वास्तविक या सामन्यात पावसाचा वारंवार हस्तक्षेप होत होता. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेशला 19 षटकांत 114 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र बांगलादेशचा संघ 17.5 षटकांत 105 धावांत सर्वबाद झाला. बांगलादेशसाठी सलामीवीर लिटन दास शेवटपर्यंत स्थिर राहिला, पण विजय मिळवण्यात अपयशी ठरला. लिटन दासने 49 चेंडूत नाबाद 54 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. पण इतर फलंदाजांना साथ मिळाली नाही. बांगलादेशच्या 9 फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही.
राशिद खान-नवीन उल हक चमकले-
अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खान आणि नवीन उल हक यांनी सर्वाधिक 4-4 विकेट्स घेतल्या. याशिवाय फजलहक फारुकी आणि गुलबदीन नायब यांना प्रत्येकी 1 विकेट घेतली. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी 59 धावा जोडल्या. मात्र यानंतर विकेट्सची रांग लागली. रहमानउल्ला गुरबाजने 55 चेंडूत 43 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर इब्राहिम झद्रानने 29 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. मात्र, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने शेवटच्या षटकांमध्ये 10 चेंडूत 19 धावा देत शानदार पूर्ण केले. अशा प्रकारे अफगाण संघाने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 115 धावा केल्या. बांगलादेशकडून रिशद होसेन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. रिशाद हुसैनने 4 षटकात 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
संबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)