T20 World Cup 2024 AFG vs BAN: एका दगडात दोन शिकार, इकडे बांगलादेशला हरवलं, तिकडे ऑस्ट्रेलियाला बाहेर ढकललं, अफगाणिस्तानने इतिहास रचला!
T20 World Cup 2024 AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या विजयासह ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे.
T20 World Cup 2024 AFG vs BAN: आज टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत (T20 World Cup 2024) अफगाणिस्तानने बांगलादेशचा (Afghanistan vs Bangladesh) पराभव करत इतिहास रचला आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानने प्रवेश केला आहे. अफगाणिस्तानने पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. डकर्थ-लुईस नियमानुसार बांगलादेशचा 08 धावांनी पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा अफगाणिस्तान हा चौथा संघ ठरला. अफगाणिस्तानच्या विजयासह ऑस्ट्रेलियाचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे.
टी-20 विश्वचषकात सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानचा संघ चांगलाच फॉर्मात होता. अफगाणिस्तानने या विश्वचषकात युगांडाविरुद्ध विजय नोंदवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. त्यानंतर अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा, पापुआ न्यू गिनीआ आणि ऑस्ट्रेलियाता पराभव केला होता. आज हीच विजयी घोडदौड कायम ठेवत अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केले. अफगाणिस्तानने एका दगडात दोन शिकार केल्याचं बोललं जात आहे. आता अफगाणिस्तानचा संघ 26 जून रोजी उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
राशिद खान आणि नवीन उल हक चमकले, सामन्यात काय घडलं?
अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खान आणि नवीन उल हक यांनी सर्वाधिक 4-4 विकेट्स घेतल्या. याशिवाय फजलहक फारुकी आणि गुलबदीन नायब यांना प्रत्येकी 1 विकेट घेतली. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी 59 धावा जोडल्या. मात्र यानंतर विकेट्सची रांग लागली. रहमानउल्ला गुरबाजने 55 चेंडूत 43 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर इब्राहिम झद्रानने 29 चेंडूत 18 धावांचे योगदान दिले. मात्र, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने शेवटच्या षटकांमध्ये 10 चेंडूत 19 धावा देत शानदार पूर्ण केले. अशा प्रकारे अफगाण संघाने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 115 धावा केल्या. बांगलादेशकडून रिशद होसेन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. रिशाद हुसैनने 4 षटकात 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. याशिवाय तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.
GOING TO THE SEMI-FINALS 🤯
— ICC (@ICC) June 25, 2024
Afghanistan defeat Bangladesh in a thriller 📲https://t.co/Jpe4CazJFY#T20WorldCup #AFGvBAN pic.twitter.com/3GLYcoXWtk
अफगाणिस्ताननं इतिहास रचला
अफगाणिस्ताननं सुपर 8 मध्ये प्रथम ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं त्यानंतर आज बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम रहमानुल्लाह गुरबाजनं 43 धावा केल्या. यानंतर राशिद खान आणि नवीन-उल-हक या दोघांनी प्रत्येकी चार विकेट संघाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानच्या विजयामुळं ऑस्ट्रेलियाचं टी 20 वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. सुपर 8 च्या ग्रुप 1 मधून भारत, अफगाणिस्तान आणि ग्रुप 2 मधून दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत आमने सामने येतील. दुसरीकडे भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीची लढत होईल.