पाकिस्तानात कोहलीपेक्षा 'या' भारतीय खेळाडूला जास्त पसंती, शोएब अख्तरचा खुलासा
Shoaib Akhtar: शोएब अख्तर म्हणाला की त्याच्या देशातील लोक विराट कोहलीपेक्षा रोहित शर्माला जास्त पसंत करतात. तो म्हणाला की, इथे रोहितला भारताचा इंझमाम-उल-हक म्हटले जाते.
Shoaib Akhtar on Virat Kohli and Rohit Sharma: पाकिस्तानचा (Pakistan) माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) खुलासा केला आहे की त्याच्या देशातील लोक भारतीय कर्णधार विराट कोहलीपेक्षा रोहित शर्माला (Rohit Sharma) अधिक पसंत करतात. तो म्हणाला की, इथे रोहितला भारताचा इंझमाम-उल-हक म्हटले जाते.
पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकची गणना महान फलंदाजांमध्ये केली जाते. तो बॉल खूप उशिरा खेळायचा. रोहित शर्माही त्याच शैलीत फलंदाजी करतो. त्याच्याकडे बॉल मारण्यासाठीही भरपूर वेळ असतो. भारत आणि पाकिस्तान दोन वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर असतील. दोन्ही संघ 24 ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळताना दिसतील.
याआधी 2019 च्या विश्वचषकात हे दोन संघ भिडले होते, त्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला होता. एका वाहिनीशी बोलताना शोएब अख्तर म्हणाला की, भारतीय खेळाडू आणि संपूर्ण टीमचे पाकिस्तानमध्ये कौतुक केले जाते. भारताबद्दल आमचे चांगले विचार आहेत.
'भारतीय संघाचे पाकिस्तानमध्ये कौतुक'
शोएब अख्तर म्हणाले की, आज एकही पाकिस्तानी असा नाही जो म्हणतो की भारताकडे चांगली टीम नाही. ते उघडपणे त्यांचं कौतुक करतात. ते विराट कोहलीला एक महान खेळाडू आणि रोहित शर्माला आणखी मोठा मानतात. शोएब अख्तर म्हणाला की, पाकिस्तानमधील लोक रोहितला भारताचा इंजमाम-उल-हक म्हणतात. ऑस्ट्रेलियात ज्या प्रकारे ऋषभ पंत खेळला त्याचं लोक कौतुक करतात. त्यानंतर सूर्यकुमार यादव आहे. त्याचंही कौतुक केलं जात आहे.
सुपर 12 सामने :
- 24 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध पाकिस्तान : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 31 ऑक्टोबर (रविवार) : भारत विरुद्ध न्यूझिलंड : दुबई : संध्याकाळी 07.30 वाजता
- 03 नोव्हेंबर (बुधवार) : भारत विरुद्ध अफगाणिस्तान : अबु धाबी : संध्याकाळी 07.30 वाजता
- 05 नोव्हेंबर (शुक्रवार) : भारत विरुद्ध B1 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता
- 06 नोव्हेंबर (सोमवार) : भारत विरुद्ध A2 (क्वॉलिफायर) : संध्याकाळी 07.30 वाजता