(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारत दौऱ्यासाठी आशियाचा चॅम्पियन श्रीलंकेचा संघ जाहीर, पाहा कुणाला मिळाली संधी?
Sri Lanka Squad: भारत दौऱ्यासाठी आशियाचा चॅम्पियन श्रीलंका संघाची निवड झाली आहे.
Sri Lanka Squad: भारत दौऱ्यासाठी आशियाचा चॅम्पियन श्रीलंका संघाची निवड झाली आहे. एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली. तीन जानेवारीपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तर 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. टी20 आणि एकदिवसीय संघाची धुरा दासुना शनाका याच्याकडे श्रीलंका बोर्डानं सोपवली आहे. एकदिवसीय मालिकेत उपकर्णधारपदी कुसल मेंडिस याची वर्णी लागली आहे. तर टी 20 साठी वानंदु हसरंगा याला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलेय.
एकदिवसीय आणि टी 20 साठी श्रीलंका संघानं 20 सदसीय संघाची निवड केली आहे. श्रीलंका संघानं टी 20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी वेगवेगळ्या खेळाडूंना संघात स्थान दिलेय. भानुका राजपक्षे याला फक्त टी 20 संघात स्थान दिलेय. भानुका राजपक्षे याचा आशिया चषकात सिंहाचा वाटा होता. त्याशिवाय नुवान तुषारा यालाही फक्त टी 20 संघात स्थान दिलेय. तर फलंदाज नुवानिदु फरनांडो आणि जेफरी वेंडरसे यांना फक्त एकदिवसीय संघात स्थान दिलेय.
भारत दौऱ्यासाठी कसा आहे श्रीलंकेचा संघ -
टी 20 मालिकेसाठी संघ - दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निकांसका, अविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रम, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, वानिंदु हसरंगा (उप कर्णधार), एशेन बंडारा, महीश तीक्षणा, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशनका, कसुन रजिता, दुनिथ वेलालेज, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.
वनडे मालिकेसाठी संघ - दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निकांसका, अविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रम, कुसल मेंडिस (उप कर्णधार), चरिथ असालंका, धनंजय डी सिल्वा, वानिंदु हसरंगा, एशेन बंडारा, महीश तीक्षणा, चमिका करुणारत्ने, दिलशान मदुशनका, कसुन रजिता, दुनिथ वेलालेज, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा, नुवानिदु फरनांडो जेफरी वेंडरसे.
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यांचं वेळापत्रक
एकदिवसीय मालिका-
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला एकदिवसीय सामना | 3 जानेवारी | वानखेडे स्टेडियम, मुंबई | सायंकाळी 7 वाजता |
दुसरा एकदिवसीय सामना | 5 जानेवारी | एमसीए स्टेडियम, पुणे | सायंकाळी 7 वाजता |
तिसरा एकदिवसीय सामना | 7 जानेवारी | सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट | सायंकाळी 7 वाजता |
टी20 मालिका-
सामना | तारीख | ठिकाण | वेळ |
पहिला टी20 सामना | 10 जानेवारी | बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी | दुपारी 2 वाजता |
दुसरा टी20 सामना | 12 जानेवारी | ईडन गार्डन्स, कोलकाता | दुपारी 2 वाजता |
तिसरा टी20 सामना | 15 जानेवारी |
ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम |
दुपारी 2 वाजता |