AFC Cup 2022 : क्रिडा मंत्रालयाकडून फिफासह एफसीकडे भारतीय फुटबॉल संघाना खेळू देण्याची मागणी
FIFA Suspended AIFF: जागतिक फुटबॉल संघटना म्हणजेच फिफानं (FIFA) भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबन टाकल्यानंतर आता भारताच्या क्रिडा मंत्रालयाने ही मागणी केली आहे.
FIFA Suspended AIFF: जागतिक फुटबॉल संघटना म्हणजेच फिफानं (International Federation of Association Football) भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली असल्याने भारतीय फुटबॉल चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे. अशामध्ये भारतीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्लब गुकलम केरल एफसी आणि एटीके मोहन बागान यांना सध्या ठरलेल्या टूर्नामेंटमध्ये भाग घेण्यासाठी फिफा (FIFA) आणि आशियाई फुटबॉल संघटनाशी (AFC) संपर्क साधला आहे. फिफाने भारतीय फुटबॉल महासंघावर काही दिवसांपूर्वी बंदी टाकल्यामुळे विदेशात असणाऱ्या भारतीय फुटबॉल क्लब्सना संबधित स्पर्धांत खेळणं अवघड झालं आहे. त्यामुळे सध्या ठरलेल्या स्पर्धांत गोकुलम केरल एफसी आणि एटीके मोहन बागान यांना खेळू देण्याची मागणी भारतीय क्रीडा मंत्रालयाने केली आहे.
FIFA suspension of AIFF | Ministry of Youth Affairs & Sports has reached out to both the International Football Federation (FIFA) & the Asian Football Confederation (AFC) to allow Indian club sides, Sree Gokulam Kerala FC & ATK Mohun Bagan, to compete in tournaments as scheduled pic.twitter.com/SaTTRxXduM
— ANI (@ANI) August 19, 2022
क्रीडा मंत्रालयाने FIFA आणि AFC शी केला संपर्क
क्रीडा मंत्रालयाने फिफा आणि आशियाई फुटबॉल संघटनाशी या प्रकरणाबाबत संपर्क साधला आहे. क्रीडा मंत्रालयाने पीआयबीच्या वेबसाइटवर एक प्रेस रिलीज जाहीर करत ही हा संपर्क साधला आहे.
उज्बेकिस्तानमध्ये आहे केरल एफसी
FIFA ने AIFF वर निलंबनाची घोषणा करण्यापूर्वी गोकुलम केरळ फुटबॉल क्लब आधीच उझबेकिस्तानमध्ये पोहोचला आहे. केरळ एफसी 23 ऑगस्ट रोजी इराण विरुद्ध सामना खेळणार होता. त्यानंतर, तो 26 ऑगस्ट रोजी दक्षिण उझबेकिस्तानविरुद्ध सामना खेळणार होता. दुसरीकडे भारताचा प्रसिद्ध क्लब ATK मोहन बागान देखील परदेशात असून 7 सप्टेंबर रोजी बहरीनमध्ये AFC कप 2022 मध्ये एक सामना खेळणार होता. पण आता निलंबनामुळे दोन्ही संघाच्या आगामी सामन्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. यामुळे याबाबत क्रीडा मंत्रालयाने फिफा आणि एएफसीशी संपर्क साधून सांगितले की, हे दोन्ही संघ फिफाने एआयएफएफवर बंदी घालण्यापूर्वीच स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले असल्याने त्यांना खेळण्याची परवानगी द्यावी.
हे देखील वाचा-