एक्स्प्लोर

FIFA World Cup 2022 : आतापर्यंत 24 लाखांहून अधिक तिकीट बुक; 'या' सामन्यांना फुटबॉल प्रेमींकडून पसंती

FIFA World Cup, Qatar 2022 : FIFA ने एक वक्तव्य जारी करत दिलेल्या माहितीनुसार, कतारमध्ये होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कपसाठी आतापर्यंत 24.50 लाख तिकीट विकण्यात आले आहेत.

FIFA World Cup, Qatar 2022 : मध्यपूर्वेत होणार्‍या पहिल्या फुटबॉल विश्वचषकाची (FIFA World Cup 2022) आतापर्यंत 24.50 लाख तिकिटं विकली गेली आहेत. फिफानं (FIFA) गुरुवारी ही माहिती दिली. तिकीट विक्रीच्या शेवटच्या टप्प्यात (5 ते 16 जुलै) 5 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाल्याचंही फिफानं म्हटलं आहे. दरम्यान, फिफा विश्वचषक यंदा कतारमध्ये (Qatar) होणार आहे.

फिफानं आपल्या निवेदनात ज्या सामन्यांची तिकीटं सर्वाधिक विकली गेली आहेत. अशा 5 सामन्यांचाही उल्लेख केला आहे. या सामन्यांमध्ये कॅमेरुन विरुद्ध ब्राझील विरुद्ध सर्बिया, पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे, कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क यांचा समावेश आहे. कतार, युएई आणि सौदी अरेबियातील सर्वाधिक प्रेक्षकांचा समावेश आहे. 

FIFA ने म्हटलं आहे की, "कतार, सौदी अरेबिया, UAE तसेच अमेरिका, मेक्सिको, इंग्लंड, अर्जेंटिना, ब्राझील, वेल्स आणि ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक फुटबॉल चाहते तिकीट खरेदी करत आहेत. या देशांमधून सर्वाधिक तिकिटं आरक्षित झाली आहेत."

तिकीट विक्रीचा पुढचा टप्पा कधी?

FIFA विश्वचषक 2022 च्या तिकिटांच्या विक्रीचे आणखी काही टप्पे बाकी आहेत. पुढील तिकीट विक्रीचा टप्पा सप्टेंबरच्या अखेरीस जाहीर केला जाईल. यानंतर, 'लास्ट मिनिट सेल्स फेज' लाँच करण्याबरोबरच 'ओव्हर द काउंटर सेल' देखील दोहामध्ये सुरू होईल.

पहिला सामना 20 नोव्हेंबरला 

FIFA विश्वचषक 2022 चा पहिला सामना यजमान देश कतार आणि इक्वेडोर यांच्यात 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. साधारणपणे फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जून-जुलैमध्ये होतात. मात्र या महिन्यात कतारमध्ये भयंकर उष्णता असते. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

फिफा काय आहे?

International Federation of Association Football अर्थात 'फिफा' ही फुटबॉलबाबतची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 'फिफा' हे फ्रेंचमधील Fédération internationale de Football Association याचे संक्षिप्त रुप आहे. क्रिकेटमध्ये आयसीसीकडून नियमन केले जाते. त्याच प्रमाणे फिफाकडून फुटबॉलचे नियमन केले जाते. फुटबॉलशी संबंधित आंतरराष्ट्रीय सामने, विविध स्पर्धांचे आयोजन फिफाकडून करण्यात येते. जगातील जवळपास 211 देश फिफाचे सदस्य आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

FIFA ची मोठी कारवाई; भारतीय फुटबॉल फेडरेशनचे निलंबन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hitendra Thakur On Vinod Tawade | विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, हिंतेंद्र ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया?Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?Hitendra Thakur On Vinod Tawde |  भाजप नेते विनोद तावडेंकडून पैसे वाटपाचा आरोप ABP MajhaVinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी  केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget