Ind vs Pak : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादात मोठी बातमी! क्रीडा मंत्रालयाने दिली मंजुरी, भारतीय संघ जाणार पाकिस्तानात
गेल्याकाही दिवसांपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy) बद्दल जात चर्चा होत आहे.
गेल्याकाही दिवसांपासून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy) बद्दल जात चर्चा होत आहे. भारतीय संघाने या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला. त्यानंतर हा वाद आणखी पेटला. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान हतबल झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीवरून सुरू असलेल्या वादात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने भारतीय संघाला पाकिस्तानात जाण्यास मान्यता दिली आहे.
ही बातमी ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. तुम्ही विचार करत असाल की जेव्हा बीसीसीआयने (BCCI) या मुद्द्यावर निर्णय घेतला आहे, तेव्हा क्रीडा मंत्रालय त्याला मान्यता कशी देऊ शकते. पण क्रीडा मंत्रालयाने ब्लाइंड भारतीय क्रिकेट संघाला परवानगी दिली आहे.
खरं तर, क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी 17 सदस्यीय भारतीय क्रिकेट संघाला 2024 ब्लाइंड टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास मान्यता दिली, परंतु अद्याप गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून हिरवा सिग्नल मिळालेला नाही. टी-20 वर्ल्ड कप 22 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान लाहोर आणि मुलतान, पाकिस्तानमध्ये खेळवला जाईल. भारत या स्पर्धेचा सध्याचा चॅम्पियन आहे.
भारतीय संघ वाघा बॉर्डरवरून जाणार पाकिस्तानात
संबंधित मंत्रालयांकडून मंजुरी मिळाल्यानंतर भारतीय संघ 21 नोव्हेंबरला वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानला जाणार आहे. भारतीय ब्लाइंड क्रिकेट संघाला अशा वेळी पाकिस्तान दौऱ्यासाठी होकार मिळाला आहे. जेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) कळवले आहे की भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. बीसीसीआयने यासंदर्भात आयसीसीला पत्र लिहिले आहे, त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन रखडले आहे.
ब्लाइंड टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत कोणते संघ सहभाग होणार?
भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त अफगाणिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, नेपाळ आणि श्रीलंका हे संघ ब्लाइंड टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत भारत गेल्या तीन वेळा चॅम्पियन आहे. फायनलमध्ये पाकिस्तानला दोनदा तर बांगलादेशला एकदा पराभूत केले आहे.
ब्लाइंड टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ - अजय कुमार रेड्डी, देबराज बेहेरा, नरेशभाई तुमडा, नीलेश यादव, संजय कुमार शाह, प्रवीण कुमार शर्मा, व्यंकटेश्वर राव, पंकज भुये, लोकेश, रामबीर सिंग, इरफान दिवाण, दुर्गा राव टोमपाकी, सुनील रमेश, सुखराम माळी, रवी अमिती, दिनेशभाई राठवा.
हे ही वाचा -