(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेला धक्का, दुखापतीमुळे टेम्बा बावुमा करो या मरो सामन्यातून बाहेर
Temba Bavuma Ruled Out: केशव महाराज करणार दक्षिण आफ्रिका संघाचं नेतृत्व
Temba Bavuma Ruled Out: पाचव्या आणि अखेरच्या टी 20 मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसलाय. नियमित कर्णधार टेम्बा बावुमाला दुखापतीमुळे संघाबाहेर बसावे लागणार आहे. त्याजागी फिरकीपटू केशव महाराज संघाचं नेतृत्व कऱणार आहे. पाच सामन्याच्या टी 20 मालिका सध्या 2-2 ने बरोबरीत आहे. बेंगळुरुमध्ये आज करो या मरोचा सामना आहे. या सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसलाय. राजकोट येथे झालेल्या चौथ्या सामन्यात टेम्बा बावुमाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो फलंदाजी करताना रिटायर झाला होता. त्याची प्रकृती अद्याप ठीक नसल्यामुळे संघाचे नेतृत्व केशव महाराजकडे सोपवण्यात आलेय.
Keshav Maharaj will lead South Africa in the 5th T20.
— Johns. (@CricCrazyJohns) June 19, 2022
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात भारताची कामगिरी
दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्यांदा टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात आलाय. दरम्यान, 2015/16 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळं रद्द झाला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, 2019/20 मध्ये मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील अखेरचा सामना पावसामुळं रद्द झाला.
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं दोन तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दोन सामने जिंकले आहेत. यामुळं या मालिकेतील पाचवा सामना जिंकणार संघ मालिका खिशात घालेल. भारतानं हा सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत हरवण्याची ही पहिलीच वेळ असेल. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी-20 मालिका जिंकणार ऋषभ पंत पहिला कर्णधार ठरेल.मालिकेच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. मात्र, गेल्या दोन सामन्यांपासून सर्व गोलंदाज लयीत असल्याचे दिसत आहे.
भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 11 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साठ सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.