(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SA : पहिल्या कसोटीसामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिका संघाला मोठा झटका, महत्त्वाचा खेळाडू मालिकेबाहेर
IND vs SA : भारतीय कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असून कसोटी सामन्यांना 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिका संघाला मोठा झटका बसला आहे.
IND vs SA Test Series 2021 : भारत (IND) आणि दक्षिण आफ्रीका (SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याची सुरुवात होणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ सेंचुरियन येथे पोहोचला आहे. तर यजमान संघ दक्षिण आफ्रिकेचे खेळाडूही कसून सराव करत आहे. पण याच सरावादरम्यान संघाला एक मोठा झटका बसला आहे. संघाचा महत्त्वाचा गोलंदाज एनरिक नॉर्खिया दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटने तसंच आयसीसीने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. दरम्यान नॉर्खिया हा महत्त्वाचा गोलंदाज नसल्याने आफ्रिका संघ संकटात सापडू शकतो, तर भारतासाठी ही एक दिलासादायक बाब आहे. नॉर्खियाच्या जागी कोणता खेळाडू येईल? याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
नॉर्खइया याने यावर्षी 5 कसोटी सामन्यात 25 विकेट घेतल्या आहेत. 28 वर्षीय नॉर्खियाने आयपीएलमध्येही आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. आतापर्यंतचा विचार करता नॉर्खियाने दक्षिण आफ्रिकेसाठी 12 कसोटी सामने खेळले असून त्यात त्यानं 47 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने भारताविरुद्धच कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं .
असा असेल भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये 3 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तर नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेमका दौरा कसा असेल यावर एक नजर फिरवूया...
कसोटी सामन्यांचे वेळापत्रक
- पहिला कसोटी सामना - 26 डिसेंबर, 2021 ते 30 डिसेंबर, 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन.
- दुसरा कसोटी सामना - 3 जानेवारी,2022 ते 7 जानेवीर, 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.
- तिसरा कसोटी सामना - 11 जानेवारी, 2022 ते 15 जानेवारी, 2022 न्यू लँड्स, केपटाऊन
एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक
- पहिला एकदिवसीय सामना - 19 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल
- दुसरा एकदिवसीय सामना - 21 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल
- तिसरा एकदिवसीय सामना - 23 जानेवारी, 2022, न्यू लँड्स, केपटाऊन
हे देखील वाचा-
- IND vs SA Test Series : कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिका टेस्ट सीरीजमध्ये करु शकतो खास रेकॉर्ड, कोच राहुल द्रविडला मागे टाकण्यासाठी सज्ज
- IND vs SA 1st Test : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा पहिला सामना होणार प्रेक्षकांशिवाय, जाणून घ्या काय आहे कारण?
- The Ashes : अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाची सरशी, दुसरा सामनाही मोठ्या फरकानं खिशात, मालिकेत 2-0 ची आघाडी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha