एक्स्प्लोर
Advertisement
Sourav Ganguly Hospitalised: सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा सौम्य झटका, रुग्णालयात दाखल
व्यायामशाळेत व्यायाम करताना सौरव गांगुलींची तब्येत बिघडली आहे. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कोलकाता : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यायामशाळेत व्यायाम करताना त्याची तब्येत बिघडली आहे. हात आणि पाठीत दुखत असल्याने आणि डोळ्यासमोर अंधारी आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
सौरव गांगुलींवर रुग्णालयाकडून अँजियोप्लास्टी करण्यात येणार आहे. डॉक्टर सरोज मंडल तसेच इतर 3 डॉक्टर हे गांगुलीवर अँजियोप्लास्टी करणार आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत, सौरव गागुंलीची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. हर्षा भोगले यांनीही गांगुली लवकरात लवकर बरे व्हावे अशी असं म्हटलं आहे.BCCI President Sourav Ganguly admitted to Woodland Hospital in Kolkata, West Bengal. More details awaited.
(file photo) pic.twitter.com/ps3mtE8tPJ — ANI (@ANI) January 2, 2021
Sad to hear that @SGanguly99 suffered a mild cardiac arrest and has been admitted to hospital.
Wishing him a speedy and full recovery. My thoughts and prayers are with him and his family! — Mamata Banerjee (@MamataOfficial) January 2, 2021
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
नाशिक
Advertisement